
नेरळ: सुमित क्षीरसागर- राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे यांनी नेरळ ग्रामपंचायतीचे मयत गणेश उर्फ टेंग्या जाधव या सफाई कामगारांच्या कुटूंबाची सांत्वन पर भेट घेतली आहे,तर जाधव कुटुंबाला 50 हजाराची आर्थिक मदत करीत कायमस्वरूपी ग्रामपंचायत मध्ये कामावर सामावून घेण्यासाठी इतर राजकीय पुढाऱ्यांच्या मदतीने आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितलं.नऊ महिने पगार न मिळाल्याने गणेश जाधव याने आर्थिक विवंचनेतून घरात गळफास घेत जीवन संपवले होते. नेरळ सम्राट नगर येथे राहणारा गणेश उर्फ टेंग्या जैतु जाधव हा गेली दहा वर्षाहून अधिककाळ नेरळ ग्रामपंचायत मध्ये सफाई कामगार म्हणून पर्मनंट कामावर होता.परंतु याच ग्रामपंचायत मधून गेली नऊ महिने सफाई कामगारांना पगार मिळाला नसल्याची माहिती समोर आली होती.गणेशची घरची परिस्थिती बेताची होती,त्यातच बँकेचे लोण न फिटल्याने घरी आलेली नोटीस,पत्नीला आपल्यासाठी लोकांच्या घरी जावून करावे लागत असलेले काम,मुलांचा शिक्षणाचा खर्च या सर्व गोष्टी राहून राहून आठवून मनाला बेचेन करीत होत्या.
अखेर पत्नी सोबत भांडण करून शनिवार 10 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरात कोणी नसताना गणेशने लटकून आपले जीवन संपविले.यावरून ग्रामपंचायतीच्या कारभाराची लक्तरे वेशीवर निघाली, काही राजकीय नेत्यांनी एकत्र येत ग्रामपंचायत विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.तेच होत नाही तर राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी मयत गणेश जाधव यांच्या राहत्या घरी म्हणजेच नेरळ सम्राट नगर येथील कुटूंबाची सांत्वन पर भेट घेतली,घरात कर्ता पुरुष नसल्याने घारे यांनी जाधव कुटुंबाला 50 हजाराची मदत दिली तर लवकरच नेरळ ग्रामपंचायत मध्ये कायमस्वरूपी कामावर रुजू होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आलं. यावेळी नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भगवान चंचे,महिला रंजना धुळे यासंह अनेक पदाधिकारी उपस्थित होते,तर ग्रामस्थ म्हणून सुमित साबळे,राजाराम गायकवाड,सिध्यार्थ सदावर्ते उपस्थित होते. दरम्यान सुधाकर घारे यांनी जाधव कुटूंबासाठी दाखवलेली कार्यतत्परता ही येथील लोकप्रतिनिधीच्या कामावर प्रश्न चिन्ह उपस्थित करणारी ठरत आहे.