संगमेश्वर ,प्रतिनिधी- संगमेश्वर तालुक्यातील अंगणवाडी रामपेठच्या सांस्कृतिक आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धेला संगमेश्वर परिसरातील रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की, नेहमीच आगळे वेगळे स्तुत्य उपक्रम राबविण्यात नेहमीच पुढाकार असणाऱ्या अंगणवाडी रामपेठच्या छोट्या मुलांचे विविध गुणदर्शन,आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धांचा कार्यक्रम श्री गणेश मंदिर संगमेश्वर च्या रंगमच्यावर नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नावडी संगमेश्वर ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच महोदया सौ.प्रज्ञा कोळवणकर होत्या.
तर संगमेश्वर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक, श्री नीलकंठ बगळे, संगमेश्वरचे सुपुत्र आणि वकील अमित शिरगावकर, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी देवरुख श्रीमती वंदना यादव हे प्रमुख अतिथी म्हणून तर नावडी ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच विवेक शेरे, सामाजिक कार्यकर्ते आणि जेष्ठ नागरिक दादा कोळवणकर, जेष्ठ नागरिक, उदय संसारे, कासम खान, पोलीस पाटील अंगराज कोळवणकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष सुर्वे, नावडी प्रभाग संघ अध्यक्षा सौ. प्रिया सावंत, सामाजिक कार्यकर्त्या सौ अर्चिता शेटे, विशेष कार्यकारी अधिकारी संतोष खातू, निलेश कदम, चैतन्य डोंगरे, सौ.अंजली कोळवणकर, सौ योगिनी डोंगरे, सौ. फरजाना पठाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते
सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगणवाडी सेविका सौ. पल्लवी शेरे यांनी केले, अंगणवाडीच्या वतीने सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले संगमेश्वर पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे, अॅड.अमित शिरगावकर आणि मान्यवरांच्या वतीने तंटामुक्ती समिती अध्यक्ष संतोष सुर्वे यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त करत असताना नियोजनाची देखील कौतुक केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात सरपंच सौ. प्रज्ञा कोळवणकर यांनी देखील कार्यक्रमास शुभेच्छा देत असताना स्तुत्य उपक्रमाबद्दल वाहवा केली. सुप्रसिध्द सूत्रसंचालक आणि संगमेश्वर तालुक्यातील कोंडअसुर्डे गावचे सुपुत्र रोशन शिंदे यांनी या कार्यक्रमाचे केलेले सूत्रसंचालन रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करून गेले तर मान्यवरांनी देखील बहारदार सुत्रसंचलन मुळे कार्यक्रम उठावदार झाला हे देखील आपल्या मनोगतात अधोरेखित केले. रोशन शिंदे यांनी केलेले बहारदार सुत्रसंचलन लक्षवेधी ठरले.
विविध गुणदर्शन,आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे परीक्षक म्हणून कोळंबे हायस्कूल चे शिक्षक संजय कोळपे सर आणि संगमेश्वर येथील श्री संजय रेडीज यांनी काम पाहिले कार्यक्रमाच्या शेवट पर्यंत रसिक प्रेक्षकांचा उदंड आणि उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये २८ बालकलाकार सहभागी झाले होते. त्यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी क्रीशी बंकापुरे (मदर तेरेसा) द्वितीय क्रमांक कु.कृष्णल कुष्टे व अध्या रहाटे (राधाकृष्ण) तृतीय क्रमांक कु.अक्षरा सुर्वे (ताराराणी) तर उत्तेजनार्थ क्रमांक चार कु.आयशा मयेकर (वकील) उतेजनार्थ क्रमांक पाच कु.रिया पवार (परी) यांनी पटकाविला.
तर विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये सर्व बालकलाकार सहभागी झाले होते त्यात प्रथम क्रमांक कु.अक्षरा सुर्वे (‘मेघा बरसोरे) द्वितीय क्रमांक कु.अक्षरा सुर्वे(राम आएंगे हे गीत) तर तृतीय क्रमांक कुमारी श्रिया वाडकर (लावणी) उतेजनार्थ चतुर्थ क्रमांक कु.गार्गी शेट्ये,आईशा मयेकर, देवांग शेट्ये, अध्या रहाटे, श्रिया वाडकर (आमच्या पप्पानी गणपती आणला) पाचवा उत्तेजनार्थ क्रमांक अंगणवाडीतील सर्व बाल कलाकार (वेड लागलंय) यांनी पटकाविले पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी सरपंच नावडी संगमेश्वर,सौ प्रज्ञा कोळवणकर, नावडी माजी सरपंच सौ.नम्रता शेट्ये, नावडी प्रभाग संघ अध्यक्ष सौ.प्रिया सावंत, संगमेश्वर पोलीस दक्षता समितीच्या सौ.माधवी भिडे, परीक्षक संजय रेडीज, संजय कोळपे, स्वयं सिद्धा महिला मंडळ सदस्य सौ. प्रियांका खातू इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या मान्यवरांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी च्या कर्मचारी सौ पल्लवी शेरे, सौ.शीतल अंब्रे यांनी सूत्रबद्ध नियोजन केले तर कार्यक्रम यशस्वी पार पडावा या करिता सामाजिक कार्यकर्ते दिनेश अंब्रे, गणेश शेरे, यांसहित पालक वर्गाने देखील परिश्रम घेतले.
फोटो सौजन्य-दिनेश अंब्रे, संगमेश्वर