संगमेश्वर चे नवीन पोलीस निरीक्षक निळकंठ बगले यांचा स्वागत सामाजिक केले स्वागत…

Spread the love

संगमेश्वर /दिनेश आंब्रे- महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या संगमेश्वर पोलीस ठाण्याला दबंग पोलीस अधिकाऱ्याची गरज होती.या पूर्वी देवगड पोलीस स्टेशन येथे आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवून चेर्चेत असलेले दबंग पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे हे मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गवरील संगमेश्वर पोलीस ठाण्यात रुजू झाले असून त्यांनी पोलीस निरीक्षक पदभार स्वीकारला आहे.

संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सिधुदुर्ग जिल्ह्यात आचरा पोलीस स्टेशन येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्तजागी दबंग पोलीस निरीक्षक म्हणुन ओळखले जाणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड पोलीस स्टेशन येथून बदली होऊन आलेले नीलकंठ बगळे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे.

नावडी चे माजी सरपंच तसेच विद्यमान उपसरपंच विवेक शेरे, पंचायत समिती चे माजी सदस्य रुपेश उर्फ बाळा शेट्ये,संगमेश्वर तालुका भाजप चे कार्यकर्ते मिथुन निकम, उमरे गावचे प्रतिष्टीत महेंद्र जाधव,असुर्डे येथील प्रतिष्ठित ठेकेदार राकेश चव्हाण, पत्रकार एजाज पटेल, पत्रकार दिनेश आंब्रे,पत्रकार मकरंद सुर्वे,संगमेश्वर येथील प्रतिष्ठित व्यापारी विवेक उर्फ बाल्या शेट्ये, रामपेठ च्या अंगणवाडी सेविका पल्लवी शेरे, मदतनीस, शीतल आंब्रे, सचिन शेरे,फणसट ग्रामसेवक दरीबा वर्गल आदी सामाजिक, राजकीय तसेच व्यापारी वर्गातील अनेकांनी दबंग पोलीस अधिकारी म्हणुन प्रख्यात असलेले व संगमेश्वर येथे रुजू झालेले पोलीस निरीक्षक म्हणुन रुजू झालेले नीलकंठ बगळे यांची सदिच्छा भेट घेऊन तसेच त्यांना बुके, पुष्प व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे चांगले काम करण्यासाठी व पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.

कायदा सुव्यवस्था राखली जाईल असे सांगताना नागरिकांनीही पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नूतन पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी केलें

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page