कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 08 फेब्रुवारी 2024 चे राशी भविष्यात.
▪️मेष :
आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नकारात्मक विचार, व्यवहार आणि नियोजना पासून दूर राहावं लागेल. अन्यथा आळस आणि दुःखात वाढ होईल. प्रकृती नरम गरमच राहील. मात्र, हातातील कार्ये सहजपणे पार पडतील. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. आज व्यावसायिक कामानिमित्त प्रवास करावा लागेल. इतरांना मदत करण्याचा आपण प्रयत्न करालं.
▪️वृषभ :
आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपल्या हातून एखादे सरकार विरोधी कार्य होण्याची शक्यता असल्यानं सावध राहावं लागेल. नवीन कार्यात अडचणी येतील. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. काही ना काही कारणाने काळजी वाटेल. उक्ती आणि कृती ह्यात संतुलन ठेवावे लागेल. व्यवसायात अडचणी उदभवतील. नशिबाची साथ मिळणार नाही. वरिष्ठांची नाराजगी ओढवून घ्यावी लागेल. संतती विषयक काळजी निर्माण होईल.
▪️मिथुन :
आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस सौख्यदायी आहे. मात्र, आपण दिवसभर आपली दैनंदिन कामेच करत राहाल. मन प्रसन्न राहण्यासाठी आपण मनोरंजनाचा आधार घ्याल. या आनंदात मित्र आणि संबंधितांना सहभागी करून घ्याल. दुपारनंतर मात्र मनात चिंता निर्माण होतील. हळवेपणाचे प्रमाण वाढेल. संतापावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
▪️कर्क :
आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील. स्त्रियांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. बौद्धिक चर्चेत तार्किक विचारांचा वापर करायला आजचा दिवस अनुकूल आहे. सामाजिक सन्मान होईल. भागीदारांकडून लाभ होतील.
▪️सिंह : आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे. रागावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या व्याधी त्रास देतील. दुपारनंतर घरात आनंद- उत्साहाचं वातावरण राहील. मानसिक प्रसन्नता आणि उत्साह जाणवेल. व्यवसायात लाभ संभवतो. सहकारी अपेक्षित सहकार्य करतील आणि त्यामुळं आपला आनंद द्विगुणित होईल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
▪️कन्या :
आपल्यासाठी चंद्र चौथा स्थानी असेल. आज शारीरिक स्वास्थ्य, मानसिक तरतरी आणि चेतना शक्तीचा अभाव राहील. सामाजिक स्तरावर मानहानी संभवते. धनहानी सुद्धा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. कार्य साफल्य न झाल्यानं निराश व्हाल. संतती विषयक चिंता सतावेल. शक्यतो प्रवास टाळा.
▪️तूळ :
आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस नवे कार्य हाती घेण्यास अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीच्या भेटीने आनंद होईल. भाग्योदय होईल. समाजात मान- सन्मान मिळतील. दुपारनंतर मात्र मन उदास होईल. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण क्लेशकारक राहील. स्थावर संपत्ती विषयक कागदपत्रा बद्दल सावध राहावे लागेल. आईची तब्बेत बिघडू शकते.
▪️वृश्चिक : आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. नियोजित काम पूर्ण न झाल्यानं नैराश्य येईल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे आज टाळावे. घरगुती वातावरण क्लेशदायी राहील. दुपार नंतर भावंडांसह आनंदात वेळ घालवाल. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील. प्रवास घडतील. गूढ विषयांचे आकर्षण होईल.
▪️धनू :
आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपणाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. प्रवास संभवतो. वैवाहिक जीवनात सुख आणि आनंद मिळेल. दुपार नंतर कुटुंबात काही कारणास्तव वाद होतील. केलेल्या कामाचे अपेक्षित फळ न मिळाल्याने नैराश्य येईल. अंतिम व ठोस निर्णय घेण्यासारखी मनःस्थिती असणार नाही.
▪️मकर :
आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज कोणाला जामीन राहू नये, अन्यथा अडचणीत सापडाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल. आपल्या बोलण्या वागण्यात संयमित राहावे लागेल. अपघाताची शक्यता असल्यानं वाहन जपून चालवावे लागेल. दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होईल. मन प्रसन्न होईल. घरातील वातावरण चांगले राहील. हातून परोपकार किंवा एखादे सत्कार्य घडेल.
▪️कुंभ :
आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांत प्रगती होईल. नवीन परिचय होतील. परंतु दुपार नंतर प्रकृती बिघडेल. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. पैसा जास्त खर्च होईल. कोर्ट- कचेरीच्या कामांत सावध राहावे लागेल. स्वभाव चिडचिडा होईल.
▪️मीन :
आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज द्विधा मनःस्थितीमुळं आपले विचार ठाम राहू शकणार नाहीत. नोकरीत वरिष्ठांकडून लाभ होतील. पदोन्नती संभवते. व्यापार विषयक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. कुटुंबात सुख समाधान नांदेल. वडीलधार्यांकडून लाभ होतील. आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवर सुद्धा लाभ संभवतात. मित्रांसह सहलीस जाण्याचे आयोजन करू शकाल.