मुंबई :- राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाच्या चिन्हावर शरद पवार गटासह अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गटानेही दावा सांगितला होता. त्यामुळे हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला आणि याप्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर आता आयोगाने राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आल्याने हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शरद पवार गटाला आता निवडणुकीला सामोरे जाताना नव्या पक्षासह आणि चिन्हासह निवडणुकीच्या मैदानात उतरावं लागणार आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळातून आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. राष्टवादी शरद पवार गटीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही प्रतिक्रीया दिली.
“ही गोष्ट आमच्यासाठी आश्चर्यकारक नाही. ज्यावेळी आमची राष्ट्रीय मान्यता काढली होती त्याच दिवशी पुढे काहीतरी घडणार आहे माझ्या मनात शंका आली होती. आमच्या दृष्टीने जे हवे ते आम्ही दिले होते. चिन्ह आणि पक्ष तुमच्या ताब्यात देऊ या बोलीवरच हे ठरल आहे. ज्यांनी हा पक्ष सुरू केला त्याच्या हातातूनच हा पक्ष काढून घेतला आहे. शरद पवारांना या सगळ्याचे दु:ख होत आहे. हे पक्ष आणि चिन्ह काढून घेणार आम्हाला माहित होतं आमच चिन्हच शरद पवार आहेत. माझ आजही अजित पवार यांना आवाहन आहे नवीन पक्ष चिन्ह घेऊन मैदानात या असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“आम्ही यांच्याविरोधात लढायला तयार आहोत आमची आमदारकी गेली तर गली, हा निकाल आम्हाला अपेक्षितच होतं. आमच नाव आणि चिन्ह हे शरद पवारच आहेत, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
जाहिरात