मुंबई गोवा महामार्गावरील बोरघर नजीक डंपरचे स्टेअरिंग जाम झाल्याने डंपर विद्युत खांबाला धडकून अपघात

Spread the love

खेड :- मुंबई – गोवा महामार्गावरील बोरघर नजीक डंपरचे स्टेअरिंग जाम झाल्याने डंपर विद्युत खांबाला धडकून झालेल्या अपघातात चालकासह अन्य दोनजण जखमी झाले .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडला . तुकाराम ज्ञानेश्वर साळे , संगिता विजय चव्हाण , बिल्लू भिमराव राठोड , अशी त्या जखमी झालेल्या तिघांची नावे असून हे सर्वजण सर्व असोंड , दापोली येथील रहिवासी आहेत . या प्रकरणी तुकाराम ज्ञानेश्वर साळे , वय ५५ वर्षे , व्यवसाय मजुरी , रा . असोंड , ता . दापोली मूळ राहणार सोलापूर यांनी फिर्याद दाखल केली . त्यानुसार चालक बिल्लू भिमराव राठोड , वय ५५ , रा . असोंड , ता . दापोली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . चालक राठोड हा त्याच्या ताब्यातील डंपर असोंड ते तुळशी असा चालवित घेऊन जात असताना बोरघर नजीक डंपरचे स्टेरिंग जाम झाले . त्यानंतर राठोड याचा डंपरवरील ताबा सुटून त्याचे ताब्यातील डंपर भरगाव वेगाने रस्त्याच्याकडेला असलेल्या एमएससीबी इलेक्ट्रिक लोखंडी खांबावर धडकला व अपघात झाला .

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page