
उल्हासनगर (अशोक शिरसाट) उल्हासनगर – ५ मध्ये गायकवाड पाडा क्र ३ सेक्शन ३६ , समाजमंदिरात दि २६ जानेवारी २०२४ रोजी ७५ वा प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिवराय फुले शाहू आंबेडकर सामाजिक संघटनेच्या वतीने संविधानाच्या प्रस्ताविका वाटप आणि रक्तदान ही जन सामान्याची सेवा रक्तदान आहे जीवनदान यामुळेच वाचतात अनेकांचे प्राण म्हणून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते तसेच या शिबिराचा लाभ ३५ तरुण युवकांनी घेतले तसेच मध्यवर्ती रुग्णालये चे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे , डॉ विलास वाघमारे, डॉ हरिश बागडे, डॉ सतीश गंगावणे, नर्स शिंदे, यांचे विशेष सहकार्य लाभले असून या शिबिरा प्रसंगी शिवराय फुले शाहू आंबेडकर सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अजय अंकुश जाधव, गणेश आरकडे, सुभाष कांबळे, अँड अमोल लोखंडे, हामिद शेख , सुरेश म्हस्के, होरिलाल गौतम मंगेश गायकवाड, निलेश वि जाधव, सुनिल होवाळ, श्रीकांत गायकवाड, सन्नी जाधव, विशाल शिनगारे, रमजान पठाण, सुरज ठाकुर, संजय सावते, सावते, भगवान पाईकराव, अँड शुभम सोमवंशी, शिवाजी धुळे, शिलवान गोडबोले, यांच्यासह नागरिक यावेळी उपस्थित होते
जाहिरात


