निलेश घाग ; जनशक्तीचा दबाव
ठाणे ; ठाणे वाहतूक पोलिसांनी विविध समाजमाध्यमांचा वापर
करून ‘रस्ते सुरक्षा अभियान – २०२४’ प्रभावीपणे राबविण्यास
सुरुवात केली आहे. यानुसार कलावंतांच्या चित्रफिती, उपक्रमांची माहिती देणारी आकर्षक चित्रे, सेल्फी पॉइंट, रोख रकमेची पारितोषिके मिळवून देणाऱ्या विविध स्पर्धा यांसारख्या अनेक अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तरुणाईचे आवडते विषय रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत वाहतूक पोलीस आणि वाहतूक या विषयानुसार ‘रील’ बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन
करण्यात आले आहे. याचबरोबर या दोन्ही विषयांना अनुसरून छायाचित्र स्पर्धेचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. यातील सर्वोत्कृष्ट छायाचित्रांची दिनदर्शिका तयार करण्यात येणार आहे.
याद्वारे तरुणाईचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न आहे.
नागरिकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती व्हावी आणि
माध्यमातून वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व पटवून देण्यात येते.
यंदाही ठाणे वाहतूक पोलीस विभागातर्फे ‘रस्ता सुरक्षा अभियान
२०२४’ राबविण्यात येत आहे.
त्यांनी त्या नियमांचे कटाक्षानेवर्षी वाहतूक पोलीस विभागातर्फे
पालन करावे या हेतूने दरवर्षी सर्वत्र रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते. या अभियानाच्या माध्यमातून
नागरिकांना वाहतूक पोलिसांच्या एक पाऊल पुढे जात
जनजागृतीसाठी डिजिटल माध्यमांचा उपयोग करण्यात येत
आहे. ठाणे जिल्हयात ‘रस्ते सुरक्षा अभियान – २०२४’ प्रभावी पद्धतीने राबवण्यात येत आहे. यासाठी समाजमाध्यमांचा
आधार घेण्यात येत आहे. नागरिकांचा उत्स्फूर्त
असा प्रतिसाद लाभत आहे. – डॉ. विनयकुमार राठोड,
उपायुक्त, वाहतूक विभाग, ठाणे
ठाणे वाहतूक पोलीस विभागाच्या फेसबुक, इंस्टाग्राम खात्यांच्या
माध्यमातून या अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध
उपक्रमांची नियमित माहिती देण्यात येत आहे. याचबरोबर
अभिनेते आणि अभिनेत्रींचे सुरक्षा जनजागृती पर संदेश देणाऱ्या
चित्रफितीही प्रसारित करण्यात येत आहेत.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात