
दिवा : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने दातिवली शिवसेना ठाकरे शाखेने भजनाचे असे विविध कार्यक्रम आयोजित केले होते त्यावेळी दिवा शहरातील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विधानसभा संघटिका सौ योगिता हेमंत नाईक यांच्या उपस्थितीत व विभाग प्रमुख श्री गुरुनाथ नाईक, मुंब्रादेवी कॉलनी विभाग प्रमुख श्री.हेमंत प्रल्हाद नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली झाले,पुर्ण दिवसभर शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या असणारे लोकगीते गायनाचा कार्यक्रम अयोजन करण्यात आले,वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचे दर्शनासाठी शेकडो शिवसैनिक हजर होते,त्यावेळी शिवसेना ठाकरे दातीवली शाखेच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार समारंभ व भजनाचे कार्यक्रम आयोजित करून त्यांना पुढील राजकीय/सामाजिक वाटचालीसाठी सौ.योगिता नाईक, श्री.गुरुनाथ नाईक व श्री.हेमंत नाईक यांच्या कडून शुभेच्छा देण्यात आल्या, या प्रसंगी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी उपशहर प्रमुख वैष्णव नवनीत पाटील,उपशहर अधिकारी अक्षय म्हात्रे,विभाग प्रमुख संजय जाधव,उपविभाग प्रमुख अजित माने,संजय निकम,शाखा प्रमुख श्री.दीपक उतेकर, शशिकांत कदम,समीर परब,शिवाजी कुंभार,अरविंद दीक्षित,प्रशांत गुढेकर,शंकर राणे,सचिन चव्हाण,एकनाथ पाटील,सूर्या सिंग व महिला आघाडी कविता उतेकर,सुनीता अहिरे,शुभदा राणे,स्वप्नाली बंदरकर,गीता पाटील,सुवर्णा जाधव,पडवळ ताई,सविता कुंभारे वहिनी यांच्यासह शिवसैनिक, महिला आघाडी ,युवा-युवती सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाहिरात


जाहिरात



