सीमा सुरक्षा दलाने कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार BSF च्या अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख BSF वेबसाइटवर जाहिरात प्रकाशित झाल्यापासून ३० दिवसांच्या आत आहे.
या भरती मोहिमेद्वारे १४१० पदे भरण्यात येणार आहेत. पुरुष उमेदवारांसाठी १३४३ पदे, तर महिला उमेदवारांसाठी ६७ पदे आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक किंवा त्याच्या समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान असावी.
याप्रमाणे करा अर्ज
- सर्वप्रथम BSF च्या rectt.bsf.gov.in या अधिकृत साइटला भेट द्या.
- होम पेजवर उपलब्ध कॉन्स्टेबल ट्रेड्समन पोस्ट लिंकवर क्लिक करा.
- एक नवीन पेज उघडेल, जिथे उमेदवारांना स्वतःची नोंदणी करावी लागेल.
- अर्ज आणि अर्ज फी भरा.
- पूर्ण झाल्यावर सबमिट वर क्लिक करा.
- कन्फर्मेशन पेज डाउनलोड करा आणि पुढील आवश्यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.