
पुणे : मनसे अध्यक्ष Raj Thakare यांनी मदतीच्या घोषणा जाहीर करणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. काही लोक घोषणा करतात, पुणे शहरासाठी मी ५० हजार कोटी जाहीर करतो. घंटा. काय आहे तुझ्या हातात? उगाच बुडबुडे सोडू नका, असं म्हणत राज ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला. तसेच मनसेच्या हातात असलेल्या सर्वात स्वच्छ ग्रामपंचायतीला पाच लाखांचा निधी बक्षीस म्हणून देणार असल्याची घोषणाही राज यांनी केली. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी स्वच्छतेचा कानमंत्र दिला. मनसेच्या हातातील जी ग्रामपंचायत असेल त्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीला मी पाच लाखाचा निधी देईल. कमी वाटलं तर जास्त देईन आणि देईनच. यांच्या सारखं नाही. पुणे शहरासाठी आज मी तुम्हाला ५० हजार कोटी देत आहे. घंटा. आहेत का हातात तुझ्या? उगाच बुडबुडे फोडायचे. काय वाटेल ते बोलायचं. जे आवाक्यात असेल ते करा, असं सांगतानाच लोकांचे मतरुपाने जे आशीर्वाद आहेत, ते कायम सोबत ठेवा, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.
