
रत्नागिरी : भाजपाचे रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा क्षेत्रप्रमुख, माजी आमदार बाळासाहेब माने यांना जन्मदिनानिमित्त कार्यकर्ते, हितचिंतकांनी शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले. यानिमित्त भाजपा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सिंधुदुर्गचे पदाधिकारी अतुल काळसेकर प्रमुख उपस्थित होते. केंद्रात व राज्यात भाजपाचा महाविजय २०२४ हे लक्ष्य ठेवून सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन या वेळी बाळासाहेब माने यांनी केले. श्री. माने यांचा वाढदिवस भाजपा कार्यालयात केक कापून साजरा करण्यात आला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर यांचाही वाढदिवस होता. त्यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, राजन फाळके, सुजाता साळवी, डॉ. ऋषिकेश केळकर, सचिन वहाळकर, उमेश कुळकर्णी, प्रशांत डिंगणकर, राजू मयेकर, राजू भाटलेकर, मनोज पाटणकर, नितीन जाधव, पल्लवी पाटील, सुप्रिया रसाळ, वर्षा ढेकणे, दादा ढेकणे, सौ. रुमडे, ॲड. भाऊ शेट्ये, मंदार खंडकर, नीलेश आखाडे यांच्यासमवेत भाजपाचे शहर व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. माने यांच्या निवासस्थानी वाढदिवसानिमित्त सत्यनारायण पुजेचे आयोजन केले होते. सायंकाळी गावडेआंबेरे येथील भाजपा कार्यकर्त्यांनी सुश्राव्य भजनसेवा सादर केली. या वेळी श्री. माने यांनी शुभेच्छा देण्याकरिता हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली. श्री. माने यांचे ज्येष्ठ बंधू हेमचंद्र माने, भगिनी, नातेवाईक उपस्थित होते. या वेळी सौ. माधवी माने आणि सुपुत्र मिहिर माने यांनी सर्वांचे अगत्याने स्वागत केले. भाजपाचे तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, तालुकाध्यक्ष दादा दळी, प्रा. नाना शिंदे, सतीश शेवडे, बापू गवाणकर, सुशांत पाटकर, श्री. देसाई, शिवसेनेचे (उबाठा) राजेंद्र महाडिक, उमेश खंडकर, योगेश हळदवणेकर, बाबू सुर्वे, विक्रम जैन, योगेश मुळ्ये, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे राजन बोडेकर यांनीही बाळासाहेब माने यांचे अभिष्टचिंतन केले. दि यश फाउंडेशन, यशवंतराव माने माध्यमिक विद्यालय येथील शिक्षक, कर्मचारी यांनीही बाळासाहेब माने यांना शुभेच्छा देत दीर्घायुष्याची प्रार्थना केली.