10 लाखाच सोनं,1 लाख रोकड,चोरांनी फोडलं घर.नेरळ शहरात चोरांचा धुमाकूळ सुरूच…

Spread the love

नेरळ/सुमित क्षीरसागर- नेरळ खांडा येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घर फोडून त्यातील 10 लाख किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने लुटले आहे,सोबतच एक लाखाची रोकड सुद्धा चोर चोरीकरून सुखरूप फरार झालेत.दरम्यान घर मालकाला घराचे काम करणे चांगलेच महागात पडले असून घरातील महिलांचे अंगावरील सर्वच दागिने चोरीला गेल्याने कपाळाला हात मारण्याची वेळ आली.दरम्यान दुसऱ्या मजल्यावर चोर चढून घर फोडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.

नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या नेरळ खांडा येथील विठ्ठल रखुमाई मंदिर आहे.या मंदिराच्या बाजूलाच दोन मजली घराची चाळ उभी आहे.चारही बाजूने नागरी वस्ती असलेल्या या चाळीत महेंद्र दुबे हे चाळीच्या दुसऱ्या मजल्यावर राहत आहेत.दुबे यांनी राहत असलेल्या घराचे काही काम सुरू केल्याने घरातील मंडळी हे बाजूच्या खोलीत राहायला गेले होते.दरमान आज गुरुवार पहाटेच्या अगोदर अंधारात अज्ञात चोरट्यानी दुबे यांचे घराची कडी कोयंडा तोडून घराच्या कपाटातील सोने-चांदीचे महिलांचे दागिने चोरले आहेत.सोबतच एक लाखाची रोकड देखील गोळा करून हे चोर फरार झालेत.दरम्यान नागरीवस्तीत आणि घराच्या दुसऱ्या मजल्यावर चोरी झाल्याने,येथील राहिवाशियानी आश्चर्य व्यक्त करीत भीती देखील दर्शवली आहे.10 लाख पर्यंत सोने चांदीचे दागिने असल्याचे घर मालक दुबे यांचे सांगणे असून दोन गल्ल्यातील रक्कम अशी एक लाख रोकड देखील चोरांनी पळवली आहे.

एकूणच काय तर या परिसरात आणखी दोन घरे काही दिवसांपूर्वी फोडण्यात आली होती.तर आता भर नागरी वस्तीत अंधाराचा फायदा घेत हे चोर घरे लुटत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नेरळ पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने कठोर पाऊले उचलण्याची गरज असून वेळेत या चोरांचा बंदोबस्त करावा म्हणून मागणी होत आहे.जर असेच सुरू राहीले तर उद्या कुठला चोर घरातील मंडळींची हत्या करीत दरोडे टाकण्याचा देखील प्रयत्न करू शकतील म्हणून प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page