शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर पक्षाकडून राहुल नार्वेकर यांचा निषेध

Spread the love

ठाणे: निलेश घाग सुप्रीम कोर्टाकडून दिलेल्या नियमाप्रमाणे मिलिंद नार्वेकर यांनी सत्ता संघर्षाचा निर्णय देणे अपेक्षित होते परंतु त्यांनी पक्षपात करून सत्तेचा गैरवापर करून शिवसेना ही एकनाथ शिंदेची असा चुकीचा निर्णय दिल्याने दिव्यातील शिवसैनिकांची घटनाबाह्य सरकारचा व राहुल नार्वेकर यांचा निषेध केला यावेळी लोकसभा महिला संपर्क प्रमुख मृणाल यज्ञेश्वर जिल्हा संघटिका कविता गावंड कल्याण ग्रामीण संघटिका दिवा शहर योगिता नाईक दिवा शहर प्रमुख सचिन पाटील दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे महिला शहर संघटिका ज्योती पाटील उप शहर प्रमुख वैष्णव पाटील विभाग प्रमुख मच्छिंद्र लाड नागेश पवार संजय जाधव अजित माने अनिकेत सावंत संजय निकम आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

निर्णयाची प्रतिक्रीया जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून पहा सविस्तर

काय म्हणाले राहुल नार्वेकर पहा सविस्तर…….

शिवसेना आमदार अपात्रतेच्या अंतिम निकालाची बुधवारी सुनावणी सुरु झाली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाच वाजल्यानंतर निकालाच्या वाचनाला सुरुवात केली. शिवसेना मूळ पक्ष कुणाचा? यासंबंधीच्या पुराव्यांवर त्यांनी मुद्दे मांडले. शिवसेना संघर्षासंबंधी ३४ याचिका या ६ गटात विभागल्या आहेत. याचिका क्रमांक १८ ही तिसऱ्या गटात आहे. चौथ्या गटात याचिका क्रमांक १९चा समावेश असून व्हीपचे उल्लंघन केल्याचा त्यात आरोप आहे. पाचव्या गटात बहुमत प्रस्तावात विरोधी मतदान केल्याचे आरोप आहेत, असं नार्वेकरांनी निकाल वाचताना सांगितलं. नार्वेकर निकाल वाचताना म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा आदर ठेवून मी निकाल देत आहे. प्रत्येक गटातील ठळक मुद्दे मी वाचून दाखवणार आहे. प्रथमदर्शनी निवडणूक आयोगाकडे असलेल्या १९९९ सालच्या शिवसेनेच्या घटनेचा आधार घ्यावा लागेल. २०१८ साली शिवसेनेने घटनेमध्ये केलेले बदल आम्हाला मान्य नाहीत.

जाहिरात

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page