कर्जत- सुमित क्षीरसागर
कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी नुकताच पत्रकार परिषद घेत सात जानेवारीला होणाऱ्या विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजनवेळी उपस्थित राहणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत माहिती दिली.त्याच सोबत मतदारसंघात कोट्यावधीचा निधी आणून सुरू केलेली विकास कामे यावर बोलत आपल्याला मिळालेल्या संधीचं आपण सोन केल्याशिवाय राहणार नाही असे म्हंटले.दरम्यान पत्रकार परिषदेत आमदार महेंद्र थोरवे यांना काही पत्रकारांनी प्रश्न विचारून राजकीय कोंडीत अडकवण्याचा प्रयत्न केला असता त्यावर ही थोरवे यांनी सफाईदारपणे प्रश्नांना उत्तर दिलं.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार सात जानेवारीला कर्जत दौऱ्यावर आहेत.कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकाराने तालुक्यात अनेक विकास कामे करण्यात आली आहेत त्याच पैकी कर्जत शहरात उभारण्यात आलेले श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रवेशद्वार तर उल्हासनदीच्या तिरी 52 फूट उभारण्यात आलेली श्री विठ्ठलाची मूर्ती अर्थात प्रति पंढरपूर आळंदी आणि,दहिवली येथील श्री धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज स्मारक व शिवसृष्टी या विकासकामांचे लोकार्पण तर कर्जत येथील प्रशासकीय भवनाचे उदघाटन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.या सोहळ्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी स्वतः पुढाकर घेतला असून शिवसेनेच्या माध्यमातून जाहीर सभा ही मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची ठेवण्यात आली आहे.या सोहळ्याबाबत आमदार थोरवे यांनी कर्जत येथील बाळासाहेब भवन येथे माहितीसाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती,यावेळी आमदार यांनी माहिती देत असतानाच मतदारसंघात आपण विकास कामांसाठी आणलेला कोट्यावधीचा निधी बाबत माहिती देत मला मिळालेल्या या संधीचं मी सोन केल्याशिवाय राहणार नाही असे ही म्हणाले तर येणाऱ्या काळात आपण आणखी काही कामे करण्याचे ठरविले आहेत,कार्यक्रम सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत.पत्रकारांनी अनेक मतदारसंघात काही कामे झाली नसून,रस्त्याची दुरवस्था असल्याचे सांगितले,दरम्यान यावेळी आमदार थोरवे यांनी सफाईदार उत्तर देत आपण चार वर्षांत ही कामे। केली आहेत बाकी ही होत आहेत,जिथे ठेकेदाराकडून दिरंगाई केली जाईल तिथे त्यांना काळ्या यादीत टाकले जाईल असे सांगण्यात आलं.