
▪️राजापुर:- अयोध्येवरून आलेल्या श्रीराम मंगल अक्षता भव्य कलश यात्रा सकल हिंदू समाज राजापूर यांचे वतीने उद्या रविवार सकाळी राजापूर शहरात आयोजित करण्यात आली आहे.
▪️श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिरातील श्रीराम बाल मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी अयोध्येवरून वरून आलेल्या श्रीराम मंगल अक्षता कलश यात्रा रविवार दि. ०७/०१/२०२४ रोजी सकाळी ठिक ९:३० वाजता राजापूरची ग्रामदेवता श्री निनादेवी मंदिर येथून सुरवात होणार आहे
▪️या मंगल अक्षता कलश यात्रेत राजापूर तालुक्यातील बहुसंख्य हिंदू बंधू भगिनींनी पारंपरिक मंगल वेशात सहभागी व्हावे असे आवाहन सकल हिंदू समाज राजापूर तालुका यांचे वतीने करण्यात येत आहे.
▪️२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या नगरीत भव्य श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या बाल मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
▪️यानिमित्त श्रीराम जन्मभूमी अयोध्या धाम येथून मंत्रवत पूजन केलेल्या मंगल अक्षता कलश आपल्या राजापूरात आलेला आहे.
▪️पुढील काही दिवसात या कलशातील पवित्र अक्षता राजापूरातील प्रत्येकाच्या घरी दिल्या जाणार आहेत आणि श्रीराम दर्शनाला यावे म्हणून निमंत्रण देण्यात येणार आहे.
▪️अयोध्येवरून आलेल्या मंगल अक्षता कलश यात्रा राजापूर शहरात काढण्यात येणार आहे
▪️तरी या ऐतिहासिक आणि मंगलमय यात्रा सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राजापूर तालुक्यातील व शहरातील सर्व हिंदू बंधू भगिनींनी या मंगल कलश यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल हिंदू समाज राजापूर यांचे वतीने करण्यात येत आहे.