
दिवा: प्रतिनिधी दिवा शहरातील साबेगड येथे काल ख्रिसमस चा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांच्या सुचनेनुसार आणि विभाग अध्यक्ष देवेंद्र भगत यांच्या मार्गदर्शनाखाली, यावेळी मनसे कडून लहान मुलांच्या आवडीचा सांताक्लॉज साकारण्यात आला होता. त्याच्या हस्ते लहान मुलांना चॉकलेट वाटप करण्यात आले. सोबतच केक कापून ख्रिसमस चा आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी दिवा साबेगड मनसेचे विभाग सचिव केतन तांबे, परेश पाटील, सयाजी चव्हाण, सागर गावकर ,वैभव पडवळ,सिध्देश पडवळ , प्रवीण धुरी हे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
जाहिरात


