
स्वत:चे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. ते चांगले असावे, चांगल्या शहरात असले पाहिजे, असे वाटत असते. पण, आपल्या बजेटमध्ये घर हवे, यासाठी दिव्यात नागरिक राहण्याकरिता येऊ लागले. दिवा प्रभाग २१ मध्ये सुविधांची सोय नसतानाही निव्वळ गरज म्हणून घाणीच्या साम्राज्यात नागरिक राहत आहेत. :- सौ.योगिता नाईक (उध्दव बाळासाहेब ठाकरे) कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक

दिवा प्रभाग क्रमांक २७ मध्ये नालेसफाईचा फक्त देखावा; गटारीही तुंबलेल्या अवस्थेत पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

ठाणे; निलेश घाग ठाणे महापालिकेतर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. या कामासाठी निविदा काढली जाते. नालेसफाईच्या कामात सत्ताधारी, मनपा प्रशासन, ठेकेदार संगनमताने लाखो रुपयांचा गैरव्यवहार होत असतो. दिवा प्रभाग २७ मधील प्रशांत नगर स्टेशन रोड, येथील प्रशांत लीला बिल्डिंग, प्रशांत छाया बिल्डिंग, प्रशांत निवास बिल्डिंग, माऊली निवास बिल्डिंग येथे नाल्यात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.

गटारींचीही अवस्था दयनीय आहे. त्यामुळे तेथील स्थानीक रहिवाश्यांना रोग-राईचा सामना करावा लागत आहे, ठाणे महानगर पालिका प्रशासने वेळीच दखल घेतली नाही, तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक सौ. योगिता नाईक यांनी दिला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनातर्फे नालेसफाईचा केवळ देखावा केला जातो आहे. दिवा प्रशांत नगर येथील भागातील नाल्यांची स्थिती अतिशय खराब असलेल्या नाल्यात अनेक ठिकाणी गाळ साचला आहे. अनेक ठिकाणी काटेरी झुडपे वाढली अाहे. सांडपाणी प्रशांत नगर परिसरात खुल्या भागात सोडण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी सांडपाण्याचे डबके साचले आहे. त्यातून स्थानीक नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. याविषयाकडे लक्ष वेधण्यासाठी सौ.योगिताताई नाईक यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनाच्या अनुषंगाने कैफियत मांडली. परिसरात सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही उपाय योजना केलेली नाही. त्याचा नागरिकांना पावसाळ्यात व इतर वेळी नाहक त्रास होतोे. त्यामुळे या विषयाकडे लक्ष द्यावे, अशी नागरिकांकडून मागणी करण्यात आली.
जाहिरात

जाहिरात

जाहिरात

