महासत्तेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यावर कारवाईची टांगती तलवार; काय आहे नेमकं प्रकरण?…

Spread the love

अमेरिकेच्या संसदेनं बुधवारी राष्ट्राध्यक्षांविरुद्धच्या महाभियोग चौकशीला मंजुरी दिली. यानंतर बायडेन यांनी रिपब्लिकन खासदारांवर वास्तविक मुद्द्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आणि निराधार राजकीय स्टंट करत असल्याचा त्यांच्यावर आरोप केलाय.

वॉशिंग्टन डीसी- अमेरिकेत मोठी राजकीय घडामोड घडत आहेत. संसदेनं बुधवारी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याविरुद्ध त्यांच्या मुलाच्या आंतरराष्ट्रीय व्यवहारांबद्दल महाभियोग चौकशी करण्याचा ठराव मंजूर केला. जीओपीच्या नेतृत्वाखालील सभागृहानं या प्रस्तावावर 221 विरुद्ध 212 मत दिले.

निराधार राजकीय स्टंट…

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी या प्रस्तावावरुन रिपब्लिकन खासदारांवर टीका केलीय. महाभियोगाची चौकशी हा निराधार राजकीय स्टंट असल्याचं त्यांनी म्हटलंय. बायडेन यांनी म्हटलंय की, देश आणि जगासाठी महत्त्वाच्या असलेल्या प्राधान्यक्रमांवर कारवाई करण्यासाठी अमेरिकन लोकांना काँग्रेसमधील त्यांच्या नेत्यांची गरज आहे. युक्रेन आणि इस्रायलला त्यांच्या संबंधित संघर्षांच्या संदर्भात निधी रोखल्याबद्दल त्यांनी रिपब्लिकनवर टीका केली.तसेच सीमा सुरक्षा मजबूत करण्यास समर्थन न दिल्याचा आरोपही केलाय.

बायडेन यांचं टिकास्त्र….

बायडेन म्हणाले की, मंगळवारी मी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली. ते रशियन आक्रमणाविरुद्ध स्वातंत्र्याच्या लढ्यात आपल्या लोकांचं नेतृत्व करत आहेत. आमची मदत मागण्यासाठी ते अमेरिकेत आले होते. तरीही काँग्रेसमधील रिपब्लिकन मदतीसाठी पुढे जाणार नाहीत. राष्ट्रपती म्हणाले की, इस्रायलचे लोक दहशतवाद्यांविरुद्ध लढत आहेत. ते आमच्या मदतीची वाट पाहत आहेत. तरीही काँग्रेसमधील रिपब्लिकन मदतीसाठी पुढे जाणार नाहीत. ते पुढे म्हणाले की, आम्हाला दक्षिण सीमेवरील परिस्थितीकडे लक्ष द्यावं लागेल. मी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यास वचनबद्ध आहे. सीमा सुरक्षा मजबूत करण्यासाठी आम्हाला पैशांची गरज आहे. परंतु, काँग्रेसमधील रिपब्लिकन मदतीसाठी कार्य करणार नाहीत, असं म्हणत बायडेन यांनी रिपब्लिकन खासदारांवर टीका केलीय.
आपल्याला अर्थव्यवस्थेतील आपली प्रगती सुरू ठेवण्याची, महागाई कमी होत राहण्याची आणि नोकरीची वाढ वाढत असल्याचं सुनिश्चित करणं आवश्यक आहे. याचा अर्थ आपल्याला सरकारी शटडाऊनसारख्या स्वत:ची आर्थिक संकटं टाळायची आहेत. बरीच कामं बाकी आहेत. मात्र रिपब्लिकन पक्षाचे खासदार याकडे लक्ष देत नाहीत..

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेनहंटर बायडेन यांच्यावर 1.4 मिलीयन डॉलर कर चोरीचा आरोप…

राष्ट्रध्यक्ष बायडेन यांचा मुलगा हंटरवर युक्रेन आणि चीनमधील व्यावसायिक व्यवहारांमध्ये कुटुंबाच्या नावावर प्रभावीपणे व्यापार केल्याचा आरोप आहे. राष्ट्राध्यक्ष जो यांचा मुलगा हंटर बायडेन यांच्यावर 1.4 मिलीयन डॉलर कर चुकवल्याचा आरोप आहे. तर हंटर आलीशान जीवनशैली जगण्यासाठी लाखो डॉलर्स खर्च करत आहे. यावर हंटर बायडेन यांनी बुधवारी वॉशिंग्टनमध्ये दिलेल्या निवेदनात म्हटलंय की, माझे वडील माझ्या व्यवसायात आर्थिकदृष्ट्या गुंतलेले नव्हते. याशिवाय राष्ट्राध्यक्ष बायडेन सुरुवातीपासूनच आपल्या मुलाचा बचाव करत आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page