भास्कर जाधवांनी सभागृहात तुफान फटकेबाजी केली आहे. यावेळी त्यांनी सुधीर मुनगंटीवार, अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करत त्यांचे कौतुकही केले आहे. वाचा नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आता तिकडे गेले…
त्यामुळे त्यांच्यासारखेच बोलतात
भास्कर जाधवांची टीका
रत्नागिरी: सुधीर भाऊ तुम्ही मासे खात नाही, असं मला सांगितलं होतं. आपण मांडलेल्या मच्छीमाऱ्यांच्या व्यथाही त्यांनी गंभीरपणे ऐकून घेतल्या होत्या. अशा शब्दात कौतुक केले पण सुधीरभाऊ तुम्ही नाकाला हात धरून मत्स्य व्यवसायातील धोरण निश्चित करा, असे भास्कर जाधव यांनी सुधीर मुनगंटीवार यांना सभागृहातच सुनावले आहे.
मोठ्या पवारांना शुभेच्छा, छोट्या पवारांना आशीर्वाद मधले पवार चुकीच्या झाडाला लटकलेत, राऊतांची घणाघाती टीका
कोकणातील आंब्यावरती ही संशोधन केले जात नाही. कोकणातील हापूस हे फळ संवेदनशील आहे. जर का डाळिंब द्राक्षावर संशोधन होते तर हेच तंत्रज्ञान संशोधन आंब्यावर का केले जात नाही असा सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील अजित घोरपडे या सगळ्यांचे सहकार क्षेत्रातील काम काम चांगले आहे. आपण गेले ३० वर्षे सभागृहात आहोत. आपण विरोधी पक्षात असताना आपण यांची मदत घेत काही प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला होता, असेही भास्कर जाधव यांनी सांगत अनेकांना शाब्दिक चिमटे घेत कौतुकही केले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आता तिकडे गेले आहेत. त्यामुळे त्यांच्यासारखेच बोलतात, असे चिमटे काढत त्यांच्या कामाचेही कौतुक केले.
यावेळी त्यांनी कोकणातील प्रश्न म्हणताना अजित दादांना आपल्या भाषणात अग्रस्थानी ठेवत आंबा, काजू, नारळ या फळांबाबत चांगले तंत्रज्ञ बोलवून या फळांची परदेशी वाहतूक व्हावी. बागायतदारांचे उत्पादनात वाढ व्हावी. बागायतदार आर्थिक सक्षम हवेत, यासाठी बैठक घ्या. दादा कोकणाबद्दल तुम्हाला आदर आस्था आहे पण ती कृतीमध्ये उतरू द्या, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाही सुनावले आहे. दादा हे सगळे निर्णय घेण्याची क्षमता तुमच्याकडे आहे. म्हणून आम्ही सातत्याने तुमच्याकडे अपेक्षा करतो, अशा भावना भास्कर जाधव यांनी सभागृहात व्यक्त केल्या.
युवकांच्या प्रश्नांसाठी रोहित पवार आक्रमक, राड्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला
राजकीय काही असून दे पण शेतकरी बागायतदार, मच्छीमार, पर्यटन यांची तुम्ही एकत्रितपणे परिषद घडवा. त्यांना आधार द्या. आपण निर्णय घेऊ या, अशीही आक्रमक भूमिका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते कोकणातील गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी मांडली आहे. अजितदादा तुम्ही अर्थमंत्री असताना आपण मच्छीमारांसाठी डिझेल परतावा प्रश्न मार्गी लावला. पण एनसीडीसीचे कर्ज मिळणार म्हणून मच्छीमार बँकांकडून कर्ज घेऊन कर्जबाजारी झाले आहेत. हे मच्छीमारांचे कोकणातील ७२० कोटी रुपयांचे कर्ज माफ करून त्यांना कर्ज मुक्त करा. हा एक महत्त्वाचा निर्णय घ्या, अशी मागणी जाधव यांनी केली.
मच्छिमार ज्या ठिकाणी राहत आहेत, त्या घराखालील जमीन त्यांच्या नावाने करण्याचाही सॅटेलाईट सर्वे झाला आहे. पण अद्याप निर्णय झाला नाही. तोही निर्णय मार्गी लावा, असे सांगत भास्कर जाधव यांनी कोकणातील शेतकरी बागायतदार पर्यटन विषयावर भास्कर जाधव सभागृहात आक्रमक भूमिका घेत काही जुने संदर्भ देत अभ्यासपूर्ण भाषण केल्याचे पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी सभागृहात अजितदादा पवार, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कामाचे कौतुक करत कोकणातील प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे गटाचे कोकणातील आमदार भास्कर जाधव यांनी कोकणातील अनेक प्रश्नांवर भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे शिंदे गट आणि भाजपवर कायमच टीकास्त्र सोडणारे आमदार भास्कर जाधव यांनी सुधीर मुनगंटीवार आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, राधाकृष्ण विखे पाटील यांचे कौतुक करत कोकणातील शेती बागायतदार आणि मासेमारी पर्यटनक्षेत्र या सगळ्या व्यथा आक्रमकपणे सभागृहात मांडत कोकणातील प्रश्नाकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं. भास्कर जाधव यांचं सभागृहातील हे भाषण सध्या अवघ्या कोकणात चर्चेचा विषय ठरल आहे.