संगमेश्वर (मकरंद सुर्वे)- श्री संत गजानन भक्त श्री गोपीनाथ मधुकर यादव धामणी यांनी यांनी दुसऱ्या वर्षीही श्रींची पालखी कोकणातून प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यातून 95 भक्त व भगिनी सोबत ढोल ताशाच्या गजरात मोठ्या उत्साहाने आनंद भक्त निवास व विसावा भक्त निवास संकुलन संस्थान ते श्री गजानन महाराज प्रगट स्थान व स्मृती मंदिराचे दर्शन करून पालखी श्रींच्या मंदिरात प्रस्तानावेळी पश्चिम द्वार येथे पालखीचे आगमन होताच श्री महाराजांच्या संस्थानातर्फे पालखीचे शाल श्रीफळ व रुपये 1000 असे देऊन स्वागत करण्यात आले तसेच पालखी संस्थांमध्ये स्थानापन्न करण्यात आली तसेच भक्त गण व भगिनींचे संस्थाना तर्फे 95 जणांचे ड्रेस व साडीचे वाटप करून त्यांचे स्वागत करण्यात आले श्री .
गजानन महाराजांचे दर्शन घेऊन सर्वांनी महाप्रसाद घेतला व सहा वाजता पालखी आपल्या परतीच्या प्रवासाला अशा प्रकारे सर्व भक्त व भगिनींनी हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने व आनंदाने पार पाडला…