दिवा ( प्रतिनिधी ) सम्यक बुध्द विहार आणि संविधान गुणगौरव समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने दिव्यातील बुद्ध विहार येथे भारताचा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून यानिमीत्ताने दिवा भाजपच्या नवनिर्वाचित महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ.सपना रोशन भगत यांचा विशेष सत्कार करण्यात आला असून यानिमीत्त संविधान गुणगौरव समितीच्यावतीने त्यांना प्रसास्ताविका भेट म्हणून देण्यात आली.
२६ नोव्हेंबर रोजी भारतात सर्वत्र संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान आहे.संविधान हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतिक आहे.संविधान म्हणजे देश्याच्या राज्यकारभारासबंधी व विविध तरतुदींचा दस्ताऐवज होय.नागरिकत्व,नागरिकांचे हक्क तसेच महिला व दुर्बल घटकांच्या हक्कावर अतिक्रमण केले जाते तेव्हा न्याय मिळावा म्हणून त्यांचे स्वातंत्र अबाधित रहावे यासाठी संविधान कामी येते.तसेच कायद्याचे संरक्षण मिळावे यासाठीच्या तरतुदी या संविधानात करण्यात आल्या आहेत.आज महिला याच संविधानाच्या जोरावर राष्ट्रपती पदांसह अनेक मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत.
यानुसारच दिव्यातीलही महिलांचा गौरव करण्यासाठी सम्यक बुद्ध विहार आणि संविधान गुणगौरव समिती यांच्यामार्फत याच संविधान दिनी सामाजिक क्षेत्रातील,राजकीय क्षेत्रातील विविध पदावर असलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये नुकत्याच दिव्यातील भाजपाच्या महिला मोर्चाच्या नुतन अध्यक्षा सौ.सपना रोशन भगत यांचा समितीचे अध्यक्ष जयसिंग यांनी प्रस्ताविका देवून सत्कार केला आहे.महिलांनी त्यांच्या क्षेत्रात अग्रेसर बनावे.त्यांना त्यांचा हक्क मिळावा असेही यावेळी जयसिंग कांबळे यांनी बोलून दाखविले.
या कार्यक्रमात ठाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री रोशन भगत,सरचिटणीस समीर चव्हाण,सुधीर घोलप,अंकित गुप्ता आदींसह आयु.विश्वास भालेराव,आयु.सोपान जाधव,आयु.सुधाकर जाधव,श्री प्रविण उत्तेकर,श्री कपिल रोडे,श्री निलेश पाटणे,श्री दिपक उत्तेकर,समाजसेविका उषा मुंडे,सरिता रसाळ,संगिता उत्तेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात