ठाणे : राज्यशासनाकडून ठाणे महानगरपालिकेस कोवॅक्सिन लसीचा साठा उपलब्ध झाला असून महापालिकेच्या नऊ आरोग्यकेंद्रात उद्यापासून (बुधवार 08 फेब्रुवारी 2023) कोवॅक्सिन लसीकरण सुरू होणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्यापपर्यत लसीकरण करुन घेतले नाही त्यांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
उद्यापासून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, पार्किंग प्लाझा, किसन नगर आरोग्य केंद्र, मानपाडा आरोग्य केंद्र, शिळ आरोग्य केंद्र, सी आर, वाडिया आरोग्य केंद्र, लोकमान्य कोरस आरोग्य केंद्र, रोझा गार्डनिया आरोग्य केंद्र, ठाणे महापालिका कौसा रुग्णालय या ठिकाणी कोवॅक्सिन लसीकरण सुरू केले जाणार आहे. तसेच 15 ते 18 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना पहिला व दुसरा डोस तसेच 18 वर्षावरील ज्या नागरिकांचा कोवॅक्सिन लसीचा पहिला, दुसरा व बुस्टर डोस दिला जाणार असून ज्यांचे लसीकरण झालेले नाही तसेच ज्यांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतलेला नाही त्यांनी लसीकरण करुन घ्यावे.
भारतात जरी कोरोना आटोक्यात असला तरी तो अजून संपलेला नाही. भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणावर आढळून येत आहेत. तरी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.