उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शेकडो महिलांसह प्रवेश
ठाणे – तन्वी फाउंडेशनच्या माध्यमातून दिवा शहरातील महिलांच्या प्रश्नांवर कायम आक्रमकपणे आवाज उठवणाऱ्या तसेच दिवा भाजपच्या महिला अध्यक्षा म्हणून मागील एक वर्षापासून सक्रिय काम करणाऱ्या ज्योती पाटील यांना पक्षाने पदावरून डावल्यानंतर त्यांनी अखेर ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेतली.
शनिवारी दुपारी ज्योती पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे नेते राजन विचारे, लोकसभा संपर्कप्रमुख खोत, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांच्या उपस्थितीत ज्योती पाटील ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेतली. यावेळी दिवा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्योती पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाला अधिक बळकटी मिळेल अशी अपेक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.दिवा शहरात पक्ष फुटी नंतर नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती, ज्योती पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण आहे.
दरम्यान अंतर्गत राजकारणाला कंटाळून ज्योती पाटील यांनी भाजपला राम राम ठोकल्याची चर्चा दिव्याच्या राजकीय वर्तुळात आहे.
यावेळी दिवा मनसेच्या मयुरी पोरजी व तेजस पोरजी यांनीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
जाहिरात