रत्नागिरी :- तालुक्यातील रिळ येथील प्रगतशील शेतकरी मिलिंद दिनकर वैद्य यांचे मुंबई – अहमदाबाद महामार्गावर कार अपघातात निधन झाले .वैद्य यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला , तर दोघं गंभीर जखमी झाले आहेत . हा अपघात गुरुवारी दुपारी पालघरच्या मेंढवन घाटात झाला .
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी तालुक्यातील रीळ गावाचे सरपंच मिलिंद वैद्य त्यांचे नातेवाईक गोडबोले कुटुंबासह गुजरातहून मुंबईच्या दिशेने येत होते .मेंढवन येथील तीव्र वळणावर चालक वैद्य यांचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी दुभाजकावर आदळली .या अपघातात वैद्य यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला , तर दोघं गंभीर जखमी झाले आहेत .चालक मिलिंद वैद्य ( वय ४३ ) , हर्षद गोडबोले ( वय ४२ ) आणि आनंदी गोडबोले ( वय ५ ) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत . चालक मिलिंद वैद्य आणि हर्षद गोडबोले यांचा जागी मृत्यू झाला , तर आनंदी गोडबोले हिचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला . अपघातात हर्षदा हर्षद गोडबोले (३७) या गंभीर जखमी झाल्या असून लहानगा अद्वेत गोडबोले ( वय १२ ) हा किरकोळ जखमी झाला आहे .
मिलिंद वैद्य यांनी शेती व्यवसायात एक प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख निर्माण केली होती . जगामध्ये एका हेक्टर मध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उत्पादन १९.२४ टन इतके इतके घेऊन त्यांनी वेगळी ओळख मिळवली होती .
जाहिरात
त्रिमुखी देवी श्री वरदान मानाई त्रेवार्षिक समायात्रा २०२४- महोत्सव लवकरच…
दिनांक २३ जानेवारी ते २५ जानेवारी २०२४
स्थळ – मंदीर परिसर , दहिवली बु. ता. चिपळूण, जि. रत्नागिरी अवश्य भेट द्या! आणि आईचा आशिर्वाद घेऊया