खेड तालुक्यातील खोपी मार्गावर कुंभाड गावानजीक टेम्पो आणि दुचाकी अपघातात एकाचा जागीच मृत्यू

Spread the love

खेड :- तालुक्यातील खोपी मार्गावर कुंभाड गावानजीक टेम्पो आणि दुचाकीमध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास झाला . या अपघात प्रकरणी टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अंकित अनिल तांबे ( रा . कुंभाड बौद्धवाडी , खेड ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे . तर रुपेश सावंत ( २६ , रा . कुंभाड – बौद्धवाडी , खेड ) हा गंभीर जखमी झाला आहे . हे दोघेही दुचाकी ( एमएच ४८ , बीझेड ३२७८ ) वरून कुंभाड येथून खेडला येत होते . याचदरम्यान रिक्षा टेम्पो चालक शुभम संतोष घोरपडे ( रा . मिर्ले – हंबरवाडी , ता . खेड ) हा टेम्पो ( एमएच ०८ , बीसी ०२३२ ) घेऊन खेडकडून कुंभाडकडे जात होता . खोपी कुंभाड मार्गावर वाडा गायकवाड येथे टेम्पो चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली . या अपघातात अंकित तांबे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर रुपेश सावंत हा जखमी झाला आहे . याप्रकरणी अंकित तांबे यांचे काका राजेंद्र जानू तांबे ( ५१ , रा . कुंभाड बौद्धवाडी , ता . खेड ) यांनी खेड पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे . या फिर्यादीनुसार टेम्पोचालक घोरपडे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page