जनशक्तीचा दबाव /साखरपा-
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील रत्नगिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा साखरपा शाखेचा ३२ वा वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायणाची महापूजा व ग्राहक मेळावा व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बँकेच्या विविध योजना पीक विमा ग्राहकांनी जास्तीत जास्त बँकेच्या विविध योजनाचा फायदा घेऊन शेतकरी व बँक ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले
यावेळी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे संचालिका नेहा माने सहाय्यक देवरुखचे सहाय्यक सरव्यवस्थापक तुषार साळुंखे संपर्क अधिकारी दिपक पाथरे शाखा व्यवस्थापक मनीषा केळकर जिल्हा नियोजन समिती सदस्य बापू शेट्ये माजी संचालिका गीतांजली सावंत आबा सावंत यांनी बँकेच्या विविध योजना व बँक राबवित असलेले उपक्रम याबाबतीत उपस्थित ग्राहक व शेतकरी वर्गाला माहिती दिली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते काका शेट्ये सोनम शेट्ये कोंडगाव ग्रुप विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संजय गांधी सचिव रवींद्र भालेकर लिपिक संतोष शिंदे साखरपा उपसरपंच ओंकार कोलते बहुसंख्य ग्राहक व शेतकरी वर्ग महिला वर्ग उपस्थित होते तर संपर्क अधिकारी दिपक पाथरे व साखरपा शाखा व्यवस्थापक मनीषा केळकर यांच्याबद्दल उपस्थित ग्राहक व शेतकऱ्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाची प्रशंसा करून त्यांनी ग्राहकांना दिलेल्या आदरपूर्वक वागणुकीची माहिती उपस्थितानी दिली ग्राहक मेळावा व शेतकरी मेळावा यशस्वी करण्यासाठी साखरपा शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरज पवार यांनी केले.