मुंबई (शांताराम गुडेकर )
अजिंक्य युवा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अति दुर्गम भागातील जेथे आजही काही मुले कित्येक किलोमीटर शाळेत अनवाणी चालत जातात.अशा पालघर जिल्ह्यातील २५ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पादत्राणे (फुटवेअर / सँडल)वाटप पालघर जिल्ह्यात रविवारी संपन्न झाला.या उपक्रमास पादत्राणे मेट्रो श्युज कंपनीने उपलब्ध करून दिली.ही पादत्राणे मिळवून देण्यास रिनोव्हेंट इंडिया कंपनीचे विशेष सहकार्य लाभले.या दोन्ही कंपनीचे आयोजक यांच्या तर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
२५ शाळांमध्ये संस्थेस पोहोचण्यास संस्थेचे सहकारी व जिल्हा परिषद दिवेकर पाडा या शाळेतील शिक्षक आदेश भोईर सर ,बहाडोली केंद्राचे केंद्र प्रमुख विलास घरत सर आणि सर्व २५ जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वर्ग यांनी सहकार्य केले.या सर्वांनी हा उपक्रम यशस्वी करण्यास मोलाचे सहकार्य केले.उपक्रमास संस्थेचे सचिव अनंत जोशी,सदस्य स्वाती गावडे , गौतम बनसोडे , रंजिता सावंत , विष्णू रामबाडे, संस्थेचे अध्यक्ष प्रसाद शितल सिताराम मांडवकर आणि संस्थेचे कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली.या सर्वाशिवाय संस्थेचा कोणताही उपक्रम यशस्वी होणे अशक्य आहे. कारण हे पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, हितचिंतक सतत निस्वार्थ पणे संस्थेच्या पाठिशी ठाम पणे उभे रहातात. या सर्व संस्थेचे कार्यकर्ते, पदाधिकारी या सर्वांचे प्रसाद शितल सिताराम मांडवकर -अजिंक्य युवा प्रतिष्ठान ( रजि.) यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त करत या कार्यक्रमाची सांगता केली.