मुंबई : “पक्ष कोणताही असो आमचा उमेदवारच नव्हे तर पदाधिकारी हे सुद्धा मराठीच असले पाहिजेत!”
या मराठी माणसांच्या हिताच्या मागण्या घेऊन तसेच मराठी भुमिपुत्रांमध्ये जनजागृती व्हावी व एक मराठी माणसांची जनमत चाचपणी म्हणून मुंबईसह-महाराष्ट्र वाचवा कृती समिती नियो. संलग्न महाराष्ट्र संरक्षण संघटना रजि. यांच्या माध्यमातून.
१) जोगेश्वरी पूर्व रेल्वे स्थानक २) बोरीवली पुर्व रेल्वे स्थानक ३) लालबाग भारतमाता सिनेमा ४) मानखुर्द पश्चिम रेल्वे स्थानक ५) मीरारोड पुर्व रेल्वे स्थानक ६) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ७) दादर पश्चिम रेल्वे स्थानक ८) दहिसर पूर्व रेल्वे स्थानक ९) चर्णीरोड गिरगाव गायवाडी १०) मुलुंड पश्चिम रेल्वे स्थानक ११) वडाळा पश्चिम रेल्वे स्थानक १२) घाटकोपर पूर्व रेल्वे स्थानक १३) काळाचौकी जिजामाता नगर १४) चेंबूर पुर्व रेल्वे स्थानक १५) कुर्ला पुर्व रेल्वे स्थानक,
अशा १५ रेल्वे स्थानकांच्या बाहेर आतापर्यंत सह्या मोहीमा अभियान संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात आले असून या पुढे सुद्धा अशाच मोहीमा राबविण्यात येणार असून मराठी जनतेला या सह्या मोहीम अभियानात एक लोकचळवळ असलेली, बिगर राजकीय संघटना, मराठी भाषा जतन संवर्धन आणि संरक्षण यासाठी सदैव कटिबद्ध असलेली मराठी माणसांची संघटना म्हणजे आपली महाराष्ट्र संरक्षण संघटना रजि. यांच्या माध्यमातून ह्या सह्या मोहीम अभियानात सामील होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
जाहिरात