यंदा दिवाळीच्या आधीच या वर्षातील शेवटचे शनी मार्गीकरण होणार आहे, आणि आता याचा प्रभाव धनलाभाच्या स्वरूपात नेमक्या कोणत्या राशींवर दिसून येऊ शकतो हे पाहूया..
२०२३ या वर्षात शनीच्या राशी बदलांसह वक्री व मार्गी होण्याचे सुद्धा अनेक योग जुळून आले होते. आज तब्बल १४० दिवसांनी शनिवारी शनीदेव मार्गी होणार आहेत. हा अत्यंत दुर्मिळ योगायोग असून यात आजच्या शनी पुष्य योगाची सुद्धा जोड लाभली आहे. या एकूणच ग्रहमानामुळे १२ राशींपैकी ५० टक्के राशींना अत्यंत सुखाचा कालावधी जगता येणार आहे. शनी ग्रह जेव्हाही कोणत्या राशीत वक्री किंवा मार्गी होतात तेव्हा त्याचा प्रभाव प्रभावाखाली येणाऱ्या राशींच्या आर्थिक, शारीरिक व मानसिक बाबींमध्ये दिसून येऊ शकतो. यंदा दिवाळीच्या आधीच या वर्षातील शेवटचे शनी मार्गीकरण होणार आहे, आणि आता याचा प्रभाव धनलाभाच्या स्वरूपात नेमक्या कोणत्या राशींवर दिसून येऊ शकतो हे पाहूया..
१४० दिवसांनी शनीदेव मार्गी, आता या ६ राशींना खोऱ्याने पैसे ओढता येणार?
मेष रास –
शनिदेव कुंभ राशीत मार्गी झाल्याने मेष राशीच्या मंडळींना अत्यंत प्रेमाचा व समाधानाचा कालावधी अनुभवता येऊ शकतो. वैवाहिक आयुष्यात प्रेम वाढू शकते. तुम्हाला जरा भौतिक सुखाचे आकर्षण असेल तर हा कालावधी तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. नवनवीन वस्तू खरेदी करू शकता. भूतकाळात इतरांना मदत केल्याचे चांगले फळ तुम्हाला आता या कालावधीत मिळू शकते. अडकून पडलेले पैसे परत मिळू शकतो.
वृषभ रास-
वृषभ राशीच्या दशम स्थानात शनीचे आगमन खूप यशदायक ठरेल. व्यवहार आणि भावना यांचे समीकरण जपा. पैशाचा अपव्यय टाळा. उद्योगधंद्यात, नोकरीत आपल्या निर्णय क्षमतेचा उपयोग मोलाचा ठरेल. सारे काही समजुतीने घेणे हिताचे ठरेल. अशा वेळी मायेची नाती खूप महत्त्वाची मोलाची ठरतील. स्तुतीपाठकापासून दोन हात दूर रहा. मैत्री जपा.
मिथुन रास-
आपल्या नवम स्थानात कुंभेचा शनी आपल्या भाग्य स्थानात आहे. हा शनीमुळे उद्योगधंद्यात, नोकरीत आपल्या विचारांचे व सल्ल्याचे स्वागत होईल. धर्मादाय कामात सार्वजनिक कामात आपला सहभाग मोलाचा ठरेल. कामानिमित्त दूरचे प्रवास घडतील. वर्षभर कार्यमग्न रहाल. शारिरीक ताकदीपेक्षामनाचे बळ खूप मोठे असते. अशावेळी आपली खरी मानसिकता आपल्या जिभेवर घोळत असते. त्यामुळे विचारपूर्वक बोलणे हिताचे ठरेल. नव्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतील ज्यातून तुमचे आर्थिक मिळकतीचे स्रोत रुंदावण्याची शक्यता आहे.
कन्या रास-
कन्या राशीला शनी षष्ठात नी तो ही स्वगृहीचा त्यामुळे कधी कधी विरोधीपक्षामुळेच आपला पराक्रम जगाला दिसून येतो. असा काहीसा प्रकार या राशीबाबत दिसून येईल. राजकारणात सामाजिक कार्यात उत्तम यश लाभेल. लोकाभिमुख होण्याची उत्तम संधी लाभेल. जमीन शेती खरेदी विक्रीत विशेष लाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. भावना आणि व्यवहार याचे गणित खूप चातुर्याने सांभाळा. थोरा -मोठ्याच्या भेटीतून नव्या कल्पनांना चालना मिळेल. त्यात उत्कर्षाची नवीन दिशा लाभेल.
धनु रास –
कुंभ राशीचा शनी धनु राशीच्या पराक्रमात (तृतीयस्थानात) जात असल्याने यावर्षीच्या सुरुवातीलाच धनु राशीची साडेसाती संपली होती. शनी स्वराशीत शुभदायक आला आहे. त्यामुळे नोकरी उद्योगधंद्यात नवीन संधी चालून येतील. प्रवासाचे योग येतील. आर्थिक बाबतीतली उलाढाल समाधानकारक घडेल. जुन्या समस्या संपुष्टात येतील. एकूण खूप दिवसांनी आलेला हा सुखद काळ आनंद देईल. पण मात्र या सर्वात कुठेही भावनेचा अतिरेक टाळा. भरवसा अतिविश्वास ठेवू नका.
कुंभ रास –
शनी कुंभ राशीत मार्गी होत असल्याने. हा शनी खूप लाभदायक ठरेल. बुद्धी प्रयत्न आणि श्रम यातून या राशीला उत्तम यश प्राप्ती होईल. या लोकांना शनीचा संयम शोधकवृत्ती नी उ्दयोगबुद्धी नैसर्गिक प्राप्त होईल. त्यामुळे आर्थक बाजू उत्तम राहील. त्यात धनस्थानात स्वराशीचा गुरु बोलण्यातून वागण्यातून आपली विद्वत्ता प्रदर्शित करेल. तर पराक्रमातील राहूची या शनीला उत्तम साथ लाभेल. त्यामुळे कुंभ राशीला दिवाळीच नाही तर पुढील काही महिने आनंदी जीवन जगता येईल.