
सध्या वाढत्या महागाईने सर्वजण हैराण झाले आहेत. महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. आजकाल सोने इतके महाग झाले आहे की ते सर्वांना परवडणारे नाही. पण इतके महाग असूनही प्रत्येक स्त्री-पुरुष सोन्याचे दागिने घालणे पसंत करतात. सोन्याचे दागिने घातल्याशिवाय स्त्रीचा श्रुंगार अपूर्ण राहतो.
लग्नात लोकांना सोन्याचे दागिने नक्कीच मिळतात, पण आजकाल सोन्याचे भाव नवनवे विक्रम मोडत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, की एकेकाळी एक लिटर पेट्रोलच्या किमतीत १० ग्रॅम सोने उपलब्ध होते. तुमचा यावर विश्वास बसणार नाही, पण हे पूर्णपणे सत्य आहे.
खरं तर, एक ६० वर्षापूर्वीचे सोन्याच्या दागिन्यांचे बिल व्हायरल होत आहे, जे पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल. याच्या काही दिवसांपूर्वी बुलेट बिल व्हायरल झाले होते, ज्याने लोकांचे लक्ष वेधले होते. सध्या सोन्याच्या दागिन्यांचे हे बिल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पावतीनुसार हे बिल १९५९ सालचे आहे, म्हणजेच बिल ६४ वर्षे जुने आहे. त्यावेळी सोन्याची किंमत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. १९५९ मध्ये १० ग्रॅम सोन्याची किंमत फक्त ११३ रुपये होती. इतक्या पैशांमध्ये तर आता एक चॉकलेट येते.
सध्या १० ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे ५२ हजार रुपये आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पावतीनुसार हे बिल ३ मार्च १९५९ चे आहे. हे महाराष्ट्रातील वामन निंबाजी अष्टेकर नावाच्या दुकानाचे बिल असून, त्यावर खरेदीदाराचे नाव शिवलिंग आत्माराम लिहिलेले आहे. यावरून त्याने सोन्या-चांदीचे दागिने खरेदी केल्याचे दिसून येते, ज्याची एकूण किंमत ९०९ रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आता हे बिल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.