
प्रतिनिधी : विनोद चव्हाण
ओमसाई भजन मंडळ मागील पंधरा वर्षापासून हरिनाम जपण्याचे काम पश्चिम विभागमध्ये करीत आहे. मंडळाचा १५ वा वर्धापन दिन सोहळ्याचे औचित्य साधून प्रथम भव्य दिव्या रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा साई छाया हायस्कूल नालासोपारा पूर्व येथे घेण्यात आली. या मध्ये एकतीस भजन मंडळानी सहभाग नोंदवला आणि एक हजार पेक्षा जास्त वारकरी मंडळी सहभागी झाले होते.
महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आहे आणि या भूमीत हरी नाम जपण्याचे काम मुंबईची लाईफ लाईन असलेल्या रेल्वे मधिल भजन करत आहेत. १५ वा वर्धापन दिन सोहळ्याचे दीपप्रज्वलन श्री संत सेवा भजन सामजिक संस्थेच्या कार्यकारिणी उपस्थित करण्यातले. त्या नंतर भजन स्पर्धा, महाप्रसाद, महिलांकरिता हळदीकुंकू असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. रेल्वे मधील गायक, वादक यांना चांगल व्यासपीठ मिळावं या उद्देशाने भजन स्पर्धा आयोजन करण्यात आले होते. ३१ भजन मंडळानी गायलेल्या भजनाचे परिक्षण ह भ प ओमकार महाराज जगताप आणि ह भ प महेश महाराज औताडे महाराज यांनी केले. त्यांनी परीक्षण करून जाहिर पहिले सांघिक परितोषिक आणि सन्मानचिन्ह – वुवा दर्शन नवाळे आई जीवदानी रे.प्र.भ.मंडळ, दुसरे सांघिक परितोषिक – बुवा विकास बावकर साई सेवा रे.प्र.भ.मंडळ, तिसरे सांघिक परितोषिक – बुवा नितीन जाधव ओम साईराज रे.प्र.भ.मंडळ, चौथा सांघिक परितोषिक – अनिल मोरे छत्रपती शिवरायरे.प्र.भ.मंडळ आणि पाचवा – बुवा प्रविण पांढरे सच्चिदानंद रे.प्र.भ.मंडळ यांना जाहीर करण्यात आले अशी एकूण १७ पारितोषिक देण्यात आली.
या कार्यक्रमाला श्री जनार्दन दयालकर, श्री. जयराम पवार श्री.शिवाजी भानत, श्री कृष्ण सुर्वे, श्री सुनील कदम, श्री अरविंद मोरे, श्री विजय डीसले, कु नितेश धुळप, श्री नितिन रसाळ, श्री विनोद बैकर,श्री जीवन मोर, श्री राम उतेकर, ह भ प श्री सदानंद महाराज गायकवाड, श्री रुपेश हातनकर, कु नितीन जाधव, श्री महेश कदम, श्री संजय रसाळ, श्री राजेंद्र दवंडे, श्री राहुल जाधव, श्री सुरेश शिंदे, श्री प्रणव लांबडे, श्री सुरेश भेकरे, श्री प्रेमनाथ गुरव, श्री विठ्ठल मयेकर, श्री अजय बोरगावकर, श्री प्रभाकर नागरेकर, श्री अनिल निवाते, ह भ प श्री चंद्रकांत गुरव, श्री विकास बावकर, ह भ प श्री अजित मालप, ह भ प श्री शिवाजी महाराज जरंडे, ह भ प श्री जयराम विर, ह भ प श्री सचिन पवार, ह भ प श्री संतोष पवार आणि ओमसाई भजन मंडळ अध्यक्ष – शंकर माळी,उपाध्यक्ष – शशिकांत साळवी, सचिव – वैभव रांजाणे, उपसचिव – नितीन चौगुले, खजिनदार – मनोहर साळवी, उपखजिनदार – उमेश ठुकराल, कार्याध्यक्ष – मयुर सावंत, उपकार्याध्यक्ष – संदिप चव्हाण, सल्लागार – कृष्णा लाड, सुधाकर बाईत, हिशोब तपासणी – संतोष काटकर, अमित पवार, संपर्क प्रमुख – गौरव गाडे, नरेश साळवी आणि संत सेवा भजन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री प्रभू माऊली आणि सर्व कार्यकारणी आणि संलग्न भजन मंडळाचे सर्व सभासद, कार्यकर्ते बक्षीस वितरणाच्या वेळी उपस्थित होते. यावेळी ओम साई भजन मंडळातील सर्व सभासदांच्या आयुष्यातील एक अविसमणीय क्षण अनुभवला अशी भावना मंडळाचे संस्थापक श्री अशोक मेस्त्री काका आणि अध्यक्ष श्री ह भ प शंकर माळी यांनी व्यक्त केले.