
ठाणे ; निलेश घाग महाराष्ट्रभरात मराठा आरक्षणाचं आंदोलन दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत असताना मराठा आरक्षण आंदोलनाच्या समर्थनार्थ आमरण उपोषणला मनोज जरांगे यांना पाठींबा देण्यासाठी दिवा शहरातील असंख्य मराठा बांधव, महिला वर्ग असंख्य संख्येने उपस्थित होते. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला अधिक बळ मिळावे याकरिता मराठा आरक्षण विरोधी मराठा आमदार, खासदार, यांच्या नावाने मराठा समाजाच्या वतीने तुमचं आमचं नातं काय….जय जिजाऊ जय शिवराय ..घोषणाबाजी व पुढाऱ्यांच्या नावाचा निषेध नोंदवून मंगळवारी संध्याकाळी दिवा टर्निंग येथे शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे. आज (१ नोव्हेंबर) उपोषणाचा आठवा वा दिवस आहे.

मराठा आमदार,खासदार यांच्या नावाने घातले श्राद्ध.

तसेच दिवा शहरात शांतप्रिय मोर्चा काढुन दिव्यातील मराठा बांधवांनी दिवा दातीवलीयेथील गणेश तलाव येथे एकत्र येऊन हिंदु संस्कृती पद्धतीने मराठा विरोधी आमदारांचे श्राद्ध घातले.

व्हिडिओ पहा सविस्तर….
दिव्यातील मराठा मोर्चाला दिव्या शहरातील असंख्य मराठा बांधवांनी समर्थन दिले . ज्याप्रमाणे तळागाळातील ग्रामीण भागात उत्स्फूर्त पाठींबा मिळत आहे त्याच पद्धतीने शहरी भागातील पाठींबा जोर धरू लागला आहे. समाजातील राजकीय पुढारी फक्त आपल्या स्वार्थासाठी समाजात जाती-पातीत तेढ निर्माण करताना दिसत आहेत.
ह्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कळून चुकले असेल, की राजकिय पुढारी मराठा समाजाची स्वकीय मतासाठी दिशभुल करीत आहेत. त्यामुळे यावर मराठा नेत्यांनी आता समाजाची फसवणूक बंद करा अशी भावना मराठा समाजातून जोर धरू लागली आहे. मराठा आरक्षणाचा लढा असाच पुढें चालु राहणार…जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, असा प्रण मोर्च्यात सहभागी झालेल्या मराठा बांधवांनी केला आहे.


जाहिरात
