मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीकडे रवाना होत आहेत. नेमक्या कुठल्या कारणासाठी ते दिल्लीला निघाले आहेत, हे कळू शकलेलं नाही. पण मराठा आरक्षणासंदर्भात चर्चेसाठी हा दौरा होत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.
वृत्तानुसार, काही वेळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई विमानतळावरून दिल्लीकडे रवाना होत आहेत. अद्याप या दौऱ्याचं कारण समोर आलेलं नाही, पण अचानक दिल्ली दौरा हा आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, सरकारला दिलेली शेवटची मुदत काल संपल्यानं मनोज जरांगे यांनी आजपासून पुन्हा आंतरवली सराटी इथं आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारनं वारंवार आश्वासनं देऊनही जरांगे आपल्या मागणीवर ठाम असल्यानं आता सरकारपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळं यावर केंद्र सरकारशी चर्चा करुन काही तोडगा काढता येतोय का? यासाठी त्यांनी दिल्लीकडे धाव घेतल्याचं बोललं जात आहे.