भालाफेकमध्ये सुमितने रचला इतिहास , सुवर्ण पदकाला गवसणी

Spread the love

चीनच्या हांगझोऊ येथे सुरू असलेल्या चौथ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताची उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. तिसऱ्या दिवशी भारताने भालाफेकमध्ये इतिहास रचला आहे. सुमित अंतिल आणि पुष्पेंद्र सिंग यांनी पुरुषांच्या भालाफेक F64 स्पर्धेत भारतासाठी २ पदके जिंकली.

सुमितने ७३.२९ मीटर भाला फेकून सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर पुष्पेंद्र सिंगने ६२.०६ मीटरचे अंतर कापून कांस्यपदक जिंकले.

दुसर्‍या दिवशी भारताने ४ सुवर्णांसह पटकावली १८ पदके

आशियाई पॅरा गेम्समध्‍ये दुसऱ्या दिवशी भारताने ४ सुवर्णांसह १८ पदके पटकावली. स्पर्धेच्या पहिल्या दोन दिवसांत भारताची पदकांची संख्या ३५ झाली आहे.

भारतीय संघाने यापूर्वी सोमवारी (दि.२३) सहा सुवर्णांसह १७ पदकांची कमाई केली होती. चीन (१५५), इराण (४४) आणि उझबेकिस्तान (३८) यांच्या मागे राहून भारताने एकूण १० सुवर्ण, १२ रौप्य आणि १३ कांस्य पदकांसह पदक तालिकेत चौथे स्थान कायम राखले आहे.

प्राची यादवने काल ( दि. २४) पॅरा कॅनो व्हीएल2 मध्ये सुवर्णपदकावर मोहर उमटवत दमदार सुरुवात करुन दिली.दरम्‍यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या मालिकेत भारतीय खेळाडूंच्या पदकविजेत्या प्रयत्नांचे कौतुक केले. ‘पॅरा कॅनोई महिला KL2 स्पर्धेत प्रतिष्ठित सुवर्णपदक जिंकल्याबद्दल @ItzPrachi चे अभिनंदन. ही अशी अपवादात्मक कामगिरी होती, ज्यामुळे भारताला अभिमान वाटला. पुढील प्रयत्नांसाठी शुभेच्छा,’ अशा शब्‍दांमध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर लिहिले.

महिलांच्या T20 प्रकारात 400 मीटर शर्यतीत, दीप्ती जीवनजी हिने 56.69 सेकंदांच्या वेळेसह सुवर्णपदक जिंकून एक नवीन खेळ आणि आशियाई विक्रम प्रस्थापित केला. शरथ शंकरप्पा मकनहल्ली याने दृष्टिदोष असलेल्या धावपटूंच्या ५००० मीटर शर्यतीत २०:१८.९० मध्ये शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक मिळवले.

डिस्कस थ्रो स्पर्धेत भारताचा क्‍लीन स्‍वीप

पुरुषांच्या F54/55/56 डिस्कस थ्रो स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी तिन्ही पदके जिंकली. नीरज यादवने गेम्स आणि आशियाई विक्रमी ३८.५६ मीटर अंतरासह सुवर्णपदक जिंकले, तर योगेश कथुनिया (४२.१३ मी) आणि मुथुराजा (३५.०६ मी) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले.

नेमबाजीत भारतीय खेळाडूंचा डंका

पॅरा नेमबाजीमध्ये, रुद्रांश खंडेलवाल आणि मनीष नरवाल यांनी अनुक्रमे P1 पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल SH1 प्रकारात रौप्य आणि कांस्यपदक मिळवले, तर रुबिना फ्रान्सिसने P2 महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल SH1 प्रकारात कांस्यपदक मिळवले.

मनीष कौरव (पुरुषांची KL3 डोंगी), अशोक (पुरुषांची 65 किलो पॉवरलिफ्टिंग), गजेंद्र सिंग (पुरुषांची VL2 कॅनो), आणि एकता भयान (महिला F32/51 क्लब थ्रो) हे कांस्यपदक विजेते ठरले.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी, भारताने उत्कृष्ट कामगिरी केली, स्टार नेमबाज अवनी लेखरा हिने सहा सुवर्ण पदकांसह एकूण १७ पदके जिंकली होती.

▪️पॅरा आशियाई क्रीडा स्‍पर्धेत भारताच्‍या ३१३ खेळाडू सहभागी झाले आहेत. टीम इंडियाचे १०० पदके जिंकण्याचे लक्ष्य आहे. रोइंग, कॅनोईंग, लॉन बाउल, तायक्वांदो आणि अंध फुटबॉलमध्ये प्रथमच भारतीय खेळाडू सहभागी झाले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page