अवकाश मोहिमेत भारतानं रचला इतिहास! गगनयानच्या क्रू मॉड्यूलचं यशस्वी प्रक्षेपण..

Spread the love

भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेकडं भारत पावलं टाकत आहे. याअंतर्गतच आज गगनयान मिशनच्या क्रू मॉड्यूलचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलंय. आधी खराब हवामानामुळं आजची उड्डाण चाचणी स्थगित करण्यात आली होती.

श्रीहरीकोटा – इस्रोनं आज स्पेसपोर्टच्या पहिल्या लॉन्च पॅडवरुन क्रू मॉड्यूल आणि क्रू एस्केप सिस्टमसह सुसज्ज सिंगल-स्टेज लिक्विड प्रोपल्शन रॉकेट लॉन्च केलंय. यापूर्वी, इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आपल्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेसाठीचं पहिलं चाचणी उड्डाण केवळ पाच सेकंदांपूर्वीच रद्द केलं होतं. मात्र नंतर आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC) इथून सकाळी 10 वाजता यशस्वी प्रक्षेपित करण्यात आलं आहे.

इस्रेच्या प्रमुखांनी सांगितलेलं कारण काय :

इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी याबाबत सांगितलं की, आज प्रक्षेपित होणारी मोहीम खराब हवामानामुळं स्थगित करण्यात आलीय. प्रक्षेपणाचं वेळापत्रक लवकरच बदलून नवीन तारीख जाहीर केली जाईल. तसंच आज काय चूक झाली हे आम्ही शोधत आहोत, असंही इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ म्हणाले होते. तसंच चाचणी वाहन पूर्णपणे सुरक्षित असून इंजिन इग्निशन झालं नाही. इस्रो या त्रुटींचं विश्लेषण करेल आणि लवकरच त्या सुधारल्या जातील. लिफ्ट बंद करण्याची वेळ पुढं ढकलण्यात आली, असंही अगोदर इस्रोच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं होतं. काही कारणास्तव स्वयंचलित लाँचमध्ये व्यत्यय आला आणि संगणकानं प्रक्षेपण थांबवलं, आम्ही यातील दोषांचं व्यक्तिचलितपणे विश्लेषण करु असंही इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितलं होतं.

पुढील वर्षी आणखी एक चाचणी :

या प्रोजेक्टला टेस्ट व्हेईकल अ‍ॅबॉर्ट मिशन-1 असं नाव देण्यात आलंय. याशिवाय, त्याला टेस्ट व्हेईकल डेव्हलपमेंट फ्लायंट (टीव्ही-डी1) असंही म्हटलं जात. आता जेव्हा ते लॉन्च केलं जाईल, तेव्हा चाचणी वाहन आपल्यासोबत अंतराळवीरांसाठी तयार केलेले क्रू मॉड्यूल घेऊन जाईल. क्रू मॉड्युल घेऊन रॉकेट साडेसोळा किलोमीटर वर जाईल आणि नंतर बंगालच्या उपसागरात उतरणार आहे. या चाचणी उड्डाणाचं यश गगनयान मोहिमेच्या पुढील सर्व नियोजनाची रूपरेषा ठरवणार आहे. यानंतर, पुढील वर्षी आणखी एक चाचणी उड्डाण होणार आहे, यामध्ये ह्युमनॉइड रोबोट पाठवले जाणार आहेत.
या मिशनचं उद्दिष्ट काय :

इस्रोनं दिलेल्या माहितीनुसार, ‘क्रू मॉड्यूल’ आणि क्रू रेस्क्यू सिस्टीमसह सुसज्ज सिंगल-स्टेज लिक्विड प्रोपल्शन रॉकेट अंतराळ केंद्राच्या पहिल्या प्रक्षेपण पॅडवरुन प्रक्षेपित केलं जाईल. चाचणी वाहन मोहिमेचं उद्दिष्ट अखेरीस प्रक्षेपित करण्याचं आहे. गगनयान मिशन अंतर्गत भारतीय अंतराळवीर यानाला पृथ्वीवर परत आणण्यासाठी क्रू मॉड्यूल आणि क्रू रेस्क्यू सिस्टीमच्या सुरक्षा मानकांचा अभ्यास करणं हे याच उद्दिष्ट आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page