महिनोमहिना प्रलंबीत अर्जांवर भुमी अभिलेख कामाकाजावर संगमेश्वर भाजपा आक्रमक भूमिकेत
संगमेश्वर ( देवरुख) – मागील काही दिवसापासून भूमी अभिलेख कार्यालयात नागरिकांच्या अर्जावर उचित कालावधीमध्ये कार्यवाही होत नसल्याने जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटत होता त्यामध्येच अनेक वेळा लोकल बातम्यांमधून भूमी अभिलेख कार्यालयाच्या कामाकाजावर ताशेरे ओढले होते.
आज वांझोळे खुर्द गावातील काही ग्रामस्थांनी भाजपा सरचिटणीस सचिन बांडागळे यांच्या माध्यमातून तालुका अध्यक्ष रुपेश कदम यांच्याशी भेट घेतली होती. अनेक महिने झाले तरीही जमीन मोजणीच्या कार्यवाहीवर एवढी दिरंगाई का? असा प्रश्न उपस्थित करीत भाजपा कार्यकर्त्यांनी संबंधित खात्याला चांगले धारेवर धरले.तेव्हा समाधानकारक उत्तर संबंधित अर्जदारांना प्राप्त झाले.संबंधितानी भाजपा पदाधिकारी यांचे आभार मानले.
तालुका अध्यक्ष रुपेश कदम आणि सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष अमोल गायकर यांनी आक्रमक पावित्रा घेतल्यावर सर्व गोष्टींची छाननी झाली. यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुधीर यशवंतराव, तालुका सरचिटणीस सचिन बांडागळे , युवामोर्चा तालुका अध्यक्ष प्रथमेश धामणस्कर , ट्रान्सपोर्ट सेलचे अंनत बांडागळे, क्रिडा सेल जिल्हा अध्यक्ष दत्ता नार्वेकर तसेच आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
…..यावर तात्काळ उचित कार्यवाही होणे गरजेचे आहे,असा प्रकार तालुक्यात यापुढे घडू देणार नाही.जनतेला यापुढे काहीही अडचण असल्यास देवरुख येथील भाजपा तालुका कार्यालयास भेट द्यावी. – श्री.रुपेश कदम (भाजपा तालुका अध्यक्ष)
भूमी अभिलेखाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित असून यावर चौकशी दाखल होणार तसेच जनतेला होणारा त्रास भाजपा कडून खपवून घेतला जाणार नाही
– श्री.अमोल गायकर
( जिल्हाध्यक्ष- सोशल मीडिया भाजपा )