दिव्यातील अनधिकृत बांधकामावर कार्यवाही करत नसल्याने दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांच्यावर निलंबनाची कारवाई करा ; अमोल केंद्रे

Spread the love

दिव्यात अनधिकृत बांधकामांना ऊत?

दबाव वृत्त : ठाणे ठाणे महानगर पालिका प्रशासन अधिकारी गाफील असल्याचा गैरफायदा घेत दिवा येथे सध्या मोठय़ा प्रमाणात लकी कंपाऊंड सदृश अनधिकृत बांधकामे सुरू असताना दिसुन येत आहेत. अतिशय निकृष्ट दर्जाच्या बैठय़ा चाळी आणि बहुमजली इमारतींमुळे मूळच्या खाडी किनारीच्या या टुमदार गावाची आता पार रया गेली असून एक अतिशय बकाल उपनगर म्हणून दिवा ओळखले जाऊ लागले आहे.

स्वस्त घरांच्या आमिषाने मुंबई परिसरातील हजारो कनिष्ठ मध्यमवर्गीय दिव्यात आले असून पाणी, वीज,शाळा, रुग्णालय आणि रस्ते या प्राथमिक सुविधांसाठीही त्यांना अक्षरश: झगडावे लागत आहे.
आठ वर्षांपूर्वी मुंब्रा-डायघर येथील लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतर अनधिकृत बांधकामे किती धोकादायक ठरू शकतात, याचे विदारक चित्र समोर आले होते. किमान त्यानंतर तरी अशी बांधकामे महापालिका प्रशासनाने रोखावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र दिव्यात सारे नियम धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट सुरूच आहे. विशेषत: पूर्व विभागातील मुंब्रादेवी कॉलनी ते दातिवली रस्त्याच्या दुतर्फा सध्या बिनदिक्कतपणे श्लोक नगर, दळवी नगर, कमलाकर स्मृती म्हसोबा नगर येथे चक्क नव्या अनधिकृत बांधकामांचे आठ मजली इमले रचले जात आहेत. तसेच जुन्या इमारतींवरही नवे मजले वाढविले जात आहेत.

ठाणे महानगर पालिकेच्या संगनमताने दिवा येथे सध्या मोठय़ा प्रमाणात लकी कंपाऊंडसदृश अनधिकृत बांधकामे सुरू आहेत.; अमोल केंद्रे

दिव्यात पाण्याची बोंब

सध्या तब्बल ४० टक्के सुद्धा दिवावासीयांना नियमित पाणीपुरवठा होत नाही. रस्त्यांची अक्षरश: दुर्दशा अर्धवट रावसारखी झाली आहे. मुंब्रादेवी-दातिवली मार्गावरच काही वर्षापूर्वी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात वायर पडून बसलेल्या विजेच्या धक्क्य़ाने एका लहान मुलीला जीव गमवावा लागला होता. विशेष म्हणजे त्या रस्त्याची परिस्थिती अजूनही ‘जैसै थे’च आहे. सांडपाण्याचे कोणतेही नियोजन नाही. त्यामुळे भर रस्त्यांवर गटाराच्या माध्यमातूनच मलनिःसारण रहदारीच्या रस्त्यावर वाहत आहेत ह्याला पालिकेचे अपयश म्हणावे?

दिवा शहरात स्वस्त घरांचे सापळे?

इतक्या असुविधा सहन करूनही केवळ स्वस्त घरांमुळेच दिव्यातील घोकादायक सापळ्यात कनिष्ठ मध्यमवर्गीय अडकत आहेत. कारण चाळींमध्ये अवघ्या दोन-चार लाखांमध्ये तर बहुमजली इमारतींमध्ये पाच ते १५ लाखांमध्ये येथे घरे उपलब्ध आहेत. अगदी बदलापूर, अंबरनाथ येथेही इतक्या स्वस्त दरात घरे उपलब्ध होत नाहीत.

ठाणे तसेच दिवा शहर ठाणे पालिका आयुक्त अभिजीत बांगर साहेब यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करताना पालिका प्रशासन कुठेही नाहीत. अनधिकृत बांधकामावर कार्यवाही करत नाहीत. दिवा शहरात १५०हून जास्त प्रमाणात अनधिकृत इमारतीचे बांधकाम चालू आहेत. यास जबाबदार नक्की कोण पालिका प्रशासन ? दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त तसेच इतर कर्मचारी वर्ग भारतीय संविधान पदाचा गैर वापर करताना दिसून येत आहेत, कर्तव्य बजावण्यात कसूर करत असल्याने निदर्शनास आणून देत आहे तसेच अश्या बेजबाबदार अधिकारी वर्गावर निलंबनाची कारवाई करून कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी याकरीता दिवा समाजसेवक अमोल केंद्रे यांनी लेखी निवेदनाद्वारे आपले मत व्यक्त केले आहे.

जाहिरात

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page