ठाणे: निलेश घाग दिवा शहरातील मुख्य रस्त्यांवर बस्तान मांडून बसलेल्या फेरीवाल्यांच्या विरोधात कायमची आणि प्रभावी कार्यवाही करण्याबाबत दि.१६ ऑक्टो रोजी दिवा शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर उदा. दिवा स्टेशन रोड, मुंब्रादेवी कॉलनी रस्ता आणि दिवा आगासन रस्ता यांच्यावर फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडून ठेवले आहे. याआधी आम्ही यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता; पण दिनांक २२ ऑगस्ट २०२३ रोजी फेरीवाल्यांचा कायमचा बंदोबस्त महापालिकेने न केल्यास आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून फेरीवाल्यांचा बंदोबस्त करू असा निर्वाणीचा इशारा दिला.
त्यानंतर का होईना पण सहाय्यक आयुक्तांनी स्वतः रस्त्यावर उतरून काही दिवस का होईना स्टेशन परिसर मोकळा ठेवण्यासाठी प्रयत्न केले. दिवसा कारवाई केल्यानंतर सायंकाळी ६.०० नंतर पुन्हा फेरीवाले रस्ता अडवून बसायला सुरवात करतात. संध्याकाळच्या वेळेत जे फेरीवाले रस्ता अडवून बसतात, त्यांना हटवण्यासाठी महापालिकेने काही कर्मचारी नियुक्त केले होते. पण हे कर्मचारी चिरीमिरी घेऊन स्वतःच त्या फेरीवाल्यांना अभय देत असल्याचे आम्ही सहाय्यक आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.
महापालिकेचा कर्मचारीच फेरीवाल्यांकडून पैसे घेत असल्याचा विडिओ आम्ही प्रसिद्ध केला आणि संबंधित कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी आम्ही केली होती. पण अपुरे कर्मचारी असल्याचे कारण देऊन त्याच व्यक्तीला फेरीवाले हटवण्याच्या कामास पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आले. जर कुंपणच शेत खायला लागले तर दाद कोणाकडे मागणार ?? इतकचं नव्हे तर शुक्रवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ रोजी आपण दिव्याचा दौरा केल्यानंतर, त्यादिवशी ठाणे पालिका आयुक्त अभिजीत बांगर येण्याच्या २० मिनिटं अगोदर सर्व फेरीवाल्यांना रस्त्यावरून हटवण्यात आले आणि आयुक्तांनी पाठ फिरवली असता अनधिकृत फेरीवाले पुनः रस्त्यावर आपलं ठाण मांडून बसले. याबाबतचे व्हिडिओ तुषार पाटील यांनी ट्विटर च्या माध्यमातून देखील पोस्ट केले होते. फेरीवाल्यांचा विषय हा निश्चितच संपू शकतो, परंतु त्याला प्रखर प्रशासकीय इच्छाशक्तीची गरज आहे; ज्या पद्धतीने ठाणे स्टेशन परिसरात पालिकेने तत्परता दाखवून दिली. त्याच पद्धतीने दिव्यातही अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठीचे आदेश देऊन त्यांची कठोर अंमलबजावणी कशी होईल याची दक्षता घ्यावी या करीता मनसे दिवा शहर अध्यक्ष श्री. तुषार पाटील यांनी ठाणे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना निवेदन देण्यात आले.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात