प्रशासकीय की भाजपाची पगारी राजवट? खड्डे बुजविण्यावरुन महाविकास आघाडीचा सवाल

Spread the love

पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी खारघरमध्ये आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या दौऱ्यासाठी पनवेल शहरातील खड्डे बुजविण्यात आला. महापालिका भाजपा नेत्यांच्या दौऱ्यासाठी काम करीत आहे, त्यामुळे महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे की भाजपाची पगारी राजवट आहे असा सवाल महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी केला. पनवेलमध्ये बावनकुळेंच्या स्वागतासाठी ढोलताशा आणि डी.जे.चा गजर सुरू असताना महाविकास आघाडीने अनपेक्षितपणे निषेध आंदोलन केले.

पनवेल शहरातील शिवाजी चौक परिसर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी सजवला होता. सकाळी ११ वाजताच्या दरम्यान ढोलताशांचा गजर, डी.जे.चा दणदणाट, भाजपा कार्यकर्त्यांची लगबग, लेझीम पथक आदीने शिवाजी चौकात स्वागताची तयारी होती. बावनकुळे येणारची चर्चां सुरू असताना अचानक शेकाप, शिवसेना ठाकरे गट आणि कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हातात पोस्टर घेवून मुक आंदोलन सुरू केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page