
राजापूर :- शहरातील कोंढतड भागाकडे जाणाऱ्या चिंचबांध पुलावर मोठ्याप्रमाणात खड्यांचे साम्राज्य पसरले आहे . त्यामुळे छोटी वाहने व पादचाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे . या रस्त्यावर असणारी वर्दळ पाहता येथील खड्डे अपघाताला निमंत्रण ठरणार आहेत . त्यामुळे हे खड्डे तातडीने बुजवावेत , अशी मागणी कोंढेतड येथील अजिम जैतापकर यांनी केली आहे . याबाबत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे .