
रत्नागिरी दि.5(जिमाका) -राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्ताने केंद्रशासनाच्या नियोजित कार्यक्रमाचा कुष्ठरोगाबद्दल शून्य कुष्ठरुग्ण संसर्गाचा २०२३-२०२७ चा जिल्हा धोरणात्मक कृती आराखड्याचे प्रकाशन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह व मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते झाले
या अभियानाचा उद्देश
२०२३-२०२७ या कालावधीत विविध स्तरावर शून्य कुष्ठरुग्ण (कुष्ठमुक्त) गांव प्रा. आ.के., तालुका नंतर जिल्हा कुष्ठमुक्त करावयाचे आहे.
अभियानातील विविध स्तरावरील कार्य
१) आशा, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांच्या नियमित भेटीत कुष्ठरोगविषयक सर्वेक्षण व तपासणी करणे.
२) सांसर्गिक रुग्ण, बालरुग्ण व विकृती रुग्ण परिसर सर्वेक्षण करणे आणि संसर्गाची साखळी खंडित करणे.
३) कुष्ठरुग्णांच्या सहवासितांची तपासणी करणे.
४) जोखमीच्या लोकसंख्येची तपासणी करणे.
५) आरोग्य शिक्षणातून जनजागृती करणे
६) शालेय विद्यार्थ्यांची RBSK पथकाकडून तपासणी करणे.
७) Hard to Reach विभागांची तपासणी करणे, असा असणार आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय यांच्या मार्गदर्शनाखाली हा आराखडा अंमलात येईल, असे सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) यांनी सांगितले.