उरण दि. 5 ( विठ्ठल ममताबादे )- काँग्रेसचे ज्येष्ठ प्रामाणिक व एकनिष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, कामगार नेते म्हणून ज्यांची सर्वत्र ओळख आहे.असे दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते शाम पदाजी म्हात्रे यांच्या जयंती निमित्त एकता कँटलिस्ट, कोकण श्रमिक संघ, व्यावसायिक विक्रेता संघ आणि आगरी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि 7 ऑक्टोंबर 2023 रोजी आदय क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाटयगृह पनवेल येथे सकाळी 10 वा.रायगड भूषण शिवशाहीर वैभव घरत यांचा मराठमोळा पोवाडा व स्फूर्ती गीतांचा प्रबोधनपर शाहिरी कार्यक्रम “आम्ही मराठी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्येष्ठ कामगार नेते शाम म्हात्रे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी शाम पदाजी म्हात्रे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला शेतकरी, प्रकल्पग्रस्त, कामगार, विविध सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी,शाम म्हात्रे साहेबांचे चाहत्यांनी व नागरिकांनी मोठया प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन कामगार नेत्या कु.श्रुती शाम म्हात्रे यांनी केले आहे.