संगमेश्वर : माखजन पंचक्रोशीतील कळंबुशीचे ग्रामस्थ आणि तेथील सोळा गाव विभागाचे माजी अध्यक्ष बबन पांडुरंग पवार यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यां सह आज भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपाच्या संगमेश्वर उत्तर मंडलाचे तालुका अध्यक्ष विनोद म्हस्के यांनी त्यांचे स्वागत केले.
प्रवेशानंतर बोलताना बबन पवार म्हणाले की,.
“पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यपद्धतीमुळे आपला भारत प्रगतीची घोडदौड करत आहे. ती देखील कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार आणि सामाजिक अथवा धार्मिक भेदाभेद न होता हा विषय आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
त्यांच्या कार्यपद्धतीलाच पुढे नेण्याचे काम जिल्हा आणि तालुका भाजपाकडून होत असल्याचे दिसून आल्यानेच आम्ही हा निर्णय घेतला.
दक्षिण भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे मार्गदर्शन, चिपळूण संगमेश्वर विधानसभा प्रमुख प्रमोद अधटराव आणि उत्तर संगमेश्वर मंडल तालुका अध्यक्ष विनोद म्हस्के यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि धामापूर गट प्रभारी प्रशांत रानडे यांच्या प्रयत्नाने हा प्रवेश करत असल्याचेही ते म्हणाले..
कार्यक्रमाला पप्पू पकडे, उदय पवार, गणेश साठे, शुभ्रा हेमण, सचिन हेमण, अनिता पवार उपस्थित होते.