
राजापूर (प्रतिनिधी) – स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘1 तारीख 1 तास’ ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमात एका हातात छत्री दुसऱ्या हातात झाडू घेऊन संततधार पावसात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी व नागरिकानीही राजापूर तहसील कार्यालय, पोलिस स्थानक परिसर, मुंबई गोवा महामार्ग तसेच राजापूर शहर परिसराची स्वच्छता केली.
रविवारी पावसाची संततधार सुरु असतानाही, तालुका प्रशासनातील अधिकारी, राजापूर जवाहर चौक येथे आज जमा झाले होते. मुख्याधिकारी प्र्स्हांत भोसले , स्वछता अभियानाचे ब्रॅंड ॲंबॅसिटर महेश शिवलकर , विविध शासकिय खात्याचे अधिकारी, कर्मचारी , राजापूर नगर परिषदेचे स्वछता प्रतिनिधी , लोकप्रतिनिधी व नागरिक सहभागी झाले होते.
राजापूर शहरातील सर्व प्रभाग , पोलिस स्थानक , तहसिल कार्यालय आवार , एस . टी. डेपो परिसर , राजीव गांधी मैदान , वरची पेठ , बाजारपेठ , आंबेवाडी , खडपेवाडी , दिवटेवाडी , कोंडेतड आदी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रेनकोट, छत्री यांच्या सोबतीने झाडू, फावडे आदी साधनांच्या सहायाने परिसराची स्वच्छता करण्यात आली. प्लास्टिक बाटल्या, कागदी पिशव्या, अनावश्यक वाढलेले गवत आदी कचरा साफ करुन राजापूर नगर परिषदेच्या गाडीमध्ये जमा करण्यात आली.