भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या प्रवासाच्या पूर्वतयारीसाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका…

Spread the love

लोकसभा विजयाचा निर्धार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर व्यक्त करणार.

जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | सप्टेंबर २८, २०२३.

भारतीय जनता पार्टीच्या ‘महाविजय २०२४’ संकल्पनेवर आधारित यश संपादन करून संपूर्ण देशभरातून ४०० हून अधिक खासदार निवडून आणण्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली असून त्याचाच एक भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा प्रवास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यामुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होणार असून रविवार द. ८ ऑक्टोबर रोजी दौऱ्याचा पहिला टप्पा सिंधुदुर्ग, कुडाळ येथे संपन्न होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात रत्नागिरी येथे बावनकुळे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी ३७५ कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहून विजयाचा संकल्प करणार असल्याची माहिती रत्नागिरी (दक्षिण) चे जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

सदर मेळावे यशस्वी होण्यासाठी पूर्वतयारी करण्याच्या उद्देशाने कार्यकर्त्यांच्या बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता श्री नृसिंहलक्ष्मी मंगल कार्यालय, देवरुख येथे संगमेश्वरमधील कार्यकर्त्यांची बैठक संपन्न होणार आहे. त्यानंतर दुपारी ०३:०० वाजता शहनाई हॉल, लांजा येथे राजापुर-लांजा विधानसभेच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडेल. यानंतर शनिवार दि. ३० सप्टेंबर रोजी दुपारी ०३:०० वाजता कुडाळ येथील आर.एस.एन. कार्यालयात सिंधुदुर्गातील तीनही विधानसभेच्या कार्यकर्त्यांची एकत्रित भव्य सभा आयोजित केलेली आहे. दि. १ ऑक्टोबर रोजी रविवारी भाजपा जिल्हा कार्यालय रत्नागिरी येथे दुपारी १२:१५ वाजता रत्नागिरी विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांची तर दुपारी ०३:०० वाजता चिपळूण कार्यालयात चिपळूण-संगमेश्वर विधानसभेच्या उर्वरित कार्यकर्त्यांची सभा पार पडणार आहे.

देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ‘फिर एक बार मोदी सरकार’ हे ब्रीद घेऊन केंद्र सरकारच्या सर्व कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोचवण्यासाठी व त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून देण्यासाठी पार्टीचे बूथ प्रमुख सक्रीय करण्याच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा मार्गदर्शन दौरा लक्षवेधी ठरणार आहे. यासाठी पूर्वतयारीच्या  बैठकांचे नियोजन करण्यात आले असून भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा समन्वयक श्री. अतुल काळसेकर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद जठार, संघटन मंत्री श्री. शैलेंद्र दळवी, रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, कणकवलीचे आमदार श्री. नितेश राणे, कुडाळ विधानसभा निवडणूक प्रमुख डॉ. निलेश राणे, सावंतवाडी विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. राजन तेली, रत्नागिरी विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. सुरेंद्रनाथ (बाळ) माने, संगमेश्वर-चिपळूण विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव, राजापुर-लांजा निवडणूक प्रमुख ऍड. दीपक पटवर्धन तसेच सह-प्रमुख सौ. राजश्री (उल्का) विश्वासराव यांची उपस्थिती असणार आहे.      

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page