भाजपच्या महिला आघाडीच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हा सरचिटणीसपदी सौ. संगिता जाधव यांची नियुक्ती…

Spread the love

पक्षवाढीसाठी यापुढेही प्रामाणिकपणे काम करत राहणार- सौ. संगिता जाधव

देवरूख, प्रतिनिधी- भाजपच्या महिला आघाडीच्या माजी संंगमेश्वर तालुकाध्यक्षा व साडवली सह्याद्रीनगर महिला मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा सौ. संगिता सुखदेव जाधव यांची भाजपच्या महिला आघाडीच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हा सरचिटणीसपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सौ. संगिता जाधव या गेली अनेक वर्षे साडवली सह्याद्रीनगर महिला मंडळाच्या अध्यक्षा आहेत. त्या सह्याद्रीनगर महिला मंडळाच्या माध्यमातून अनेक स्तुत्य उपक्रम राबवत असतात. या सर्व उपक्रमांचे परिसरातून कौतुक होत असते. सह्याद्रीनगर महिला मंडळाच्या माध्यमातून काम करीत असताना त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी ओझरेखुर्द जि. प. गटातून जिल्हा परिषदेची निवडणुक लढवली. या निवडणुकीत त्यांनी चांगल्याप्रकारे मते घेतली. व सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. भाजपच्या महिला आघाडीच्या संंगमेश्वर तालुकाध्यक्षा असताना तर त्यांनी आपल्या संघटन कौशल्याची झलक दाखवून दिली.

महिला तालुकाध्यक्षा म्हणून काम करताना त्यांनी संपुर्ण तालुका पिंजून काढत महिलांना एकत्रीत करण्याचे काम केले. पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. मिळालेल्या संधीचे सोने कसे करावे, हे संगिता जाधव यांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी त्यांनी अतिशय चांगल्याप्रकारे पार पाडली आहे. तालुकाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात त्यांनी महिलांचे संघटन करून पक्षवाढीसाठी कालबध्द कार्यक्रम घेतले. महिलांचे मोठ्या प्रमाणात भाजपात पक्षप्रवेश करून घेतले.

तालुक्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचून त्यांनी पक्षासाठी झोकून देवून काम केले आहे. त्यांनी पक्षासाठी केलेल्या या कामाची पोचपावती म्हणूनच पक्षाकडून त्यांच्यावर आता दक्षिण रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी म्हटले कि, पक्षाने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली असून ही जबाबदारी आपण नक्कीच पार पाडू. व यापुढेही पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करत राहणार असून पक्ष वाढवण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page