अंत्रवली तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी प्रथमच महिला..

Spread the love

कडवई – राज्यात गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी तंटा मुक्ती अभियानास सुरुवात झाली. तंटामुक्ती अभियानाचे आता हे सोलावे वर्ष असून तंटामुक्ती यशस्वी करण्यासाठी गावोगावी तंटामुक्ती समितीची स्थापना करण्यात आली. मात्र, या समितीच्या अध्यक्षपदापासून महिलांना दूरच ठेवण्यात आले आहे. या समितीत महिला अध्यक्षांची संख्या कमी आहे.
तंटामुक्ती अभियानात महिलांचा सहभाग 30 टक्के असावा, असे शासनाचे आदेश असताना महिला कारभारणीला अध्यक्षपदापासून दूरच ठेवण्यात आले आहे. गावचा पोलिस पाटील तंटामुक्त समितीचा पदसिद्ध सचिव असतो. त्यामुळे येथे ही संधी कमीच आहे. यामुळे महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानात महिलांची उपस्थिती नगण्यच असते.
अंत्रवलीच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी प्रथमच महिलेची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी शबाना नेवरेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी महिलेची नियुक्ती करण्याची ही अंत्रवली गावातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आता अंत्रवलीतील भांडणतंटे गावातच मिटविण्यासाठी महिला पुढाकार घेणार असल्याचे वेगळे पथदर्शी चित्र समाजासमोर येणार आहे.
ग्रामस्थरावर असलेले तंटे गावातच मिटवून गावात शांतता व सुव्यवस्था यांचा सलोखा अबाधित राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असा निर्धार नवनियुक्त अध्यक्षांनी यावेळी अंत्रवली गावातील प्रथम नागरिक व सन्मानित सरपंच कवीता सुर्वे,गावचे पोलीस पाटील तावडे, गावातील ग्रामस्थ बाबू सुर्वे,सुरेश माईन,हमीद कडवईकर,हमीद हाजू,महमद नेवरेकर,तुकाराम कांबळे, किर्ती मालप,शर्वरी मालप,महेश सुर्वे इत्यादी उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page