दिवा दातीवली येथे मातोश्री मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिना निमित्त महिला पार्लर प्रशिक्षणाला ऊत्तम प्रतिसाद

Spread the love

दिवा : सध्या ब्युटी पार्लरची व्याप्ती खूप वाढली आहे. गाव असो वा शहर, रस्ता असो वा मोहल्ला, जवळपास सर्वत्र ब्युटी पार्लर पाहायला मिळतील. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया अधिकतर सौंदर्य वाढवण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये जाणे पसंत करतात. अशा परिस्थितीत जर एखाद्या महिलेने ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरू केला तर तो तिच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. ब्युटी पार्लरचा व्यवसाय अगदी कमी खर्चात कोणत्या प्रकारे सुरू करता येईल.

याकरिता मा.आमदार गुरुवर्य मा.श्री. सुभाषजी भोईर साहेब व विभाग प्रमुख श्री गुरुनाथ (दादा) नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मातोश्री मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे- दातिवली शाखेच्या वतीने महिला वर्गासाठी घेण्यात आलेल्या पार्लर कोर्सेसला महिला वर्गाचा उस्फुर्त प्रतिसाद लाभल्या बद्दल दिवा शहरातील महिला वर्गाचे मनपुर्वक आभार व्यक्त करते.

सौ योगिता हेमंत नाईक
महिला उपशहर प्रमुख दिवा
शिवसेना -उध्दव बाळासाहेब ठाकरे

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page