दिवा गणेश नगर येथील अखेर त्या बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल ; पहा सविस्तर

Spread the love

ठाणे: दिवा गणेश नगर येथील गायरान सर्वे क्रमांक २३२/१ भूखंडावर राहत असलेल्या नागरिकांना कायम स्वरुपी हक्क देण्याचे महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्या पासून दिवा शहरातील गायरान भूखंडावर सन.२००३ पासून श्री.गणेश मंदिर को.ऑ.सोसायटी चाळ क्रमांक १ ते १० येथील

मौजे-दातिवली, गणेश नगर, आगासन रोड, दिवा, तालुका व
जिल्हा ठाणे येथील सर्वे नं. २३२/१ वसुली वॉर्ड क्र. ०२, निवडणुक वॉर्ड क्र. १४, चौ. फुट येथे असलेली चाळ नंबर ६ मधील रूम क्षेत्र मोज मापाची रूम, बांधकाम विटांच्या भिंतीचे असून, चुना रेतीचे त्यावर प्लास्टर केलेले आहे व वर सिमेंट पत्र्याचे छप्पर असून, सदरहु रूम मध्ये राहत असलेल्या रहिवाश्यांना इमारत बांधण्याचे कारण सांगून नाहक त्रास दिला जात होता.

मागील २० वर्षां पासून राहत असलेल्या रहिवाश्यांना पालिकेच्या माध्यमातून क्लस्टर योजना लागू झाली असल्याचे सांगण्यात आले. क्लस्टर योजनेचा सर्वे नंबर टाकून झाले असताना पुन्हा त्या ठिकाणच्या भूखंडावर शासन अधिनियमानुसार इमारत बांधली जाऊ शकते? असा संभ्रम रहिवाशांमध्ये निर्माण झाला आहे.

सुरवातीला ठाणे महानगर पालिका सामान्य कर,जल कर, मलनिःसारण कर, शिक्षण कर, ई.च्या माध्यमातून नागरिकांकडून कर वसूली केली जाते, त्याच कराच्या माध्यमातून नागरिकांना मिळायला हवी तशी सुविधा मिळत नाही. त्या उलट पालिका प्रशासन संगनमताने दिव्यात अनधिकृत मनमानी कारभार करीत असल्यामुळे गणेश नगर येथील रहिवाश्यांना संकटाशी सामना करावा लागला, एकनाथ गायकर यांचे म्हणणे असे होते की सदर जागा माझ्या मालकी हक्काची आहे. मला तिथे बिल्डिंग बांधायची आहे. रूम खाली करा नाहीतर तुम्हाला बघून घेईन.अश्याप्रकारे चाळीतील रहिवाश्यांना ऑफिस मधे बोलावून धमक्या देण्यास सुरुवात केली.त्यानुसार भा.द.वी.क नुसार मुंब्रा पोलिस ठाणे येथे संबंधित बांधकाम व्यवसायिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जर नागरिकांच्या बांधकाम विकासकाच्या संगन मताने इमारत बांधताना येत असेल तर बांधावी. परंतु रहिवाशांचा विरोध असताना बांधकाम करण्यासाठी जोर जबरदस्ती करू नये तसे केल्यास कायद्याच्या अनुषंगाने कायदेशीर उत्तर दिले जाईल, असे मत दिवा समाजसेवक अमोल धनराज केंद्रे यांनी व्यक्त केले. तसेच पोलिस प्रशासनाचे आभार मानले.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page